ला लीगामध्ये काल मागील वर्षाचा विजेता संघ रिअल माद्रिदचा सामना रिअल बेटीस या संघाशी झाला. या सामन्यात माद्रीद संघावर पराभवाची नामुष्की आली. अतिरिक्त वेळेमध्ये त्यांना एक गोल स्वीकारावा लागल्याने त्यांनी हा सामना १-० असा गमावला. क्रिस्तिआनो रोनाल्डोने ला लीगामध्ये ५ सामन्यांच्या बंदीनंतर काल परत संघात प्रवेश केला.
सामन्याच्या पहिल्या सत्रात तिसऱ्या मिनिटाला रिअल बेटीस संघाला गोल करण्याची संधी मिळाली. या संधीत ते माद्रिदच्या गोलकीपर कियौर नवास याला चुकवण्यात अन्टेनिओ सनाब्रिया यशस्वी झाला. परंतु माद्रिदचा डिफेंडर दानी कार्वाज़ल याने अनपेक्षितपणे गोलपोस्टच्या लाईनवर त्याचा फटका रोखला. त्यानंतर १७ व्या मिनिटाला माद्रिदच्या लुका मॉड्रीच याने एक उत्तम चाल रचली. तो माद्रीदच्या बॉक्स पासून बॉल घेऊन आला. रोनाल्डोने बॉक्समध्ये रन केला पण त्याला दोन डिफेंडर्सने मार्क केले होते. त्यामुळे मॉड्रीचने किक केली. त्याने केलेली किक गोलपोस्टचा वेध घेऊ शकली नाही.
पहिल्या सत्रात २८ व्या मिनिटाला बेलने बेटीसच्या बॉक्समध्ये रोनाल्डोसाठी एक उत्तम संधी निर्माण केली. त्यात रोनाल्डोला फक्त गोलकीपरला चुकवायचे होते. त्यात त्याला अपयश आले. त्याने मारलेला फटका बेटीसच्या गोलकीपर अँटोनियो आदान याने रोखली. माद्रिद येथे जन्मलेल्या अँटोनियो आदान याचा आजचा दिवस खूप चांगला होता त्याने ४५ व्या मिनिटाला रिअल माद्रिदच्या इस्कोने बॉक्समधून मारलेली कीक खूप कमी प्रतिक्रियेच्या वेळेत अडकवली.त्यानंतर पहिले सत्र गोलशून्य बरोबरीत संपले.
दुसऱ्या सत्रात माद्रिद संघाकडून खूप खरं खेळ दाखवण्यात आला. परंतु ते गोल करण्यात अपयशी ठरले. सामन्याच्या ७४ व्या मिनिटाला माद्रिदने राईट विंग वरून चाल रचली. इस्कोने बॉल क्रॉस इन केला. बेलने या क्रॉसला सुंदर बॅक हील करत बॉल गोलपोस्टला कडे टाकला. हा अनपेक्षित प्रकार बेटीसच्या गोलकीपरला समजला नाही. परंतु बॉलने गोल जाळ्यात न जाता गोलपोस्टच्या डाव्या खांबाचा वेध घेतला. त्यामुळे गोल होऊ शकला नाही. सामना गोलशून्य बरोबरीतच होता. त्यानंतर सामन्यात गोल होऊ शकला नाही. निर्धारित वेळेत गोल झाला नाही. सामन्यात अतिरिक्त ४ मिनिटे वेळ दिला गेला.
अतिरिक्त वेळेत पहिले दोन मिनिटे गोल झाला नाही. या सामन्यात गोल होण्याचे चिन्हे धूसर झाली असता रिअल बेटीससंघाने चाल रचली. बॉक्सच्या डाव्या कोपऱ्यातुन बॉल मध्ये टाकला गेला. त्यावर अन्टेनिओ सनाब्रिया याने हेडर करत ९३ व्या मिनिटाला गोल केला. या गोलमुळे हा सामना रिअल बेटीसने १-० असा जिंकला. या विजयामुळे बेटीसचा संघ ला लीगामध्ये सहाव्या स्थानावर विराजमान झाले. सामना गमावल्यामुळे रिअल माद्रीद सातव्या स्थानावर गेले आहे.