---Advertisement---

अन् त्याने चेन्नईच्या ‘थलायवा’चा ऑटोग्राफ मिळवलाच, दिल्लीच्या अष्टपैलू खेळाडूचे स्वप्न पूर्ण, फोटो व्हायरल

On: मंगळवार, ऑक्टोबर 5, 2021 8:08 PM
---Advertisement---

सोमवारी (४ ऑक्टोबर) दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झालेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या ५० व्या सामन्यात दिल्लीचा अष्टपैलू खेळाडू ललित यादवचे स्वप्न पूर्ण झाले. दुबईमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यानंतर भारताचा माजी दिग्गज आणि सीएसके कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने त्याची ऑटोग्राफ केलेली जर्सी यादवला भेट दिली.

चोवीस वर्षीय ललित यादवने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक छायाचित्र पोस्ट केले. ज्यामध्ये धोनी त्याच्या जर्सीवर स्वाक्षरी करताना दिसत आहे. फोटोसह कॅप्शनमध्ये यादवने लिहिले आहे की, ‘स्वप्ने सत्यात उतरतात. फक्त स्वप्न पाहण्याचे धाडस करा.’ ललित यादव चेन्नईविरुद्धच्या सामन्यासाठी दिल्लीच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग नव्हता. पण हा सामना त्याच्यासाठी संस्मरणीय ठरला आहे.

https://twitter.com/LalitYadav03/status/1445195456817082371

तत्पूर्वी, सामन्यात नाणेफेक जिंकत दिल्ली कॅपिटल्स संघाने चेन्नईला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. फलंदाजी करताना केवळ अंबाती रायडूचा अपवाद वगळता चेन्नईचे जवळपास सर्वच फलंदाज अपयशी ठरले. त्याने ५ चौकार आणि २ षटकार ठोकत नाबाद ५५ धावा झळकावल्या. त्याला धोनीने १८ धावांची साथ दिली. तर उथाप्पाने देखील १९ धावा केल्या. दिल्लीकडून अक्षर पटेलने २ तर आवेश खान, नॉर्खिया आणि आश्विन यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. सर्वच गोलंदाजांनी अतिशय कमी धावा देत चेन्नईला १३६ धावांवर रोखलं.

चेन्नईने दिल्लीसमोर १३७ धावांचे आव्हान ठेवले होते. दिल्लीची फलंदाजीही चेन्नईप्रमाणे ढासळली. पण शिखरने सुरुवातीला केलेल्या ३९ धावा आणि शिमरॉन हेटमायरच्या महत्त्वाच्या वेळी केलेल्या नाबाद २८ धावांच्या जोरावर दिल्लीने सामन्यावर पकड ठेवली. शेवटच्या ३ चेंडूत २ धावांची गरज असताना फलंदाजीला आलेल्या कागिसो रबाडाने चौकार लगावत दिल्लीला ३ गड्यांनी सामना जिंकून दिला.

दिल्ली संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर विराजमान झाला आहे, तर चेन्नई दुसऱ्या स्थानावर आहे. दोन्ही संघांनी या आधीच प्लेऑफमध्ये स्थान मिळवले आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

धोनी भारताचा सर्वोत्कृष्ट कसोटीपटू! ‘सुपरस्लो’ खेळीनंतर सोशल मीडियावर उठला बाजार

ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज कर्णधाराला येतेय भारतीय मसाल्यांची आठवण; म्हणाली, ‘मला शक्य तितक्या लवकर…’

धोनीच्या खेळीला ‘टेस्ट इनिंग’ म्हणणाऱ्यांना फ्लेमिंगने सुनावले, म्हणाला…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---