ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व करणारी प्रसिद्ध धावपटू ललिता बाबर ही महसूल अधिकारी संदीप भोसले यांच्यासोबत विवाहबद्ध झाली. साताऱ्यातील यशोदा टेक्निकल संस्थेच्या मैदानावर हा विवाहसोहळा पार पडला.
महसूल अधिकारी संदीप भोसले सोलापूरच्या लिगाडवाडी गावातील आहेत.
यावेळी राजकीय, क्रीडा तसेच इतर क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. त्यात अभिनेत्री अमृता खानविलकर, निर्माता संजय जाधव, माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे, आमदार शशिकांत शिंदे, आमदार अनिल बाबर, जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे निंबाळकर, कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख हे उपस्थित होते.
ललिता बाबर एक प्रसिद्ध क्रीडापटू असल्यामुळे लोकांनी मोठ्या प्रमाणावर या विवाहाला गर्दी केली होती. दुपारी अडीच वाजता हा विवाह पार पडला.
या विवाहाची काही क्षणचित्रे…