दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू लान्स क्लूजनरची(Lance Klusener) अफगाणिस्तान(Afghanistan) क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी(coach) शुक्रवारी नियुक्ती करण्यात आली आहे.
अफगाणिस्तानने त्यांचे माजी प्रशिक्षक फिल सिमन्सचा कार्यकाल संपल्यानंतर या पदासाठी अर्ज मागवले होते. त्यानंतर आता क्लूजनर अफगाणिस्तानच्या संघाची प्रशिक्षक म्हणून धूरा सांभाळणार आहे.
याबद्दल क्लूजनर म्हणाले, ‘जगातील सर्वोत्तम प्रतिभा असणाऱ्या काही क्रिकेटपटूंबरोबर काम करण्याची संधी मिळत असल्याने मी उत्सुक आहे.’
तसेच नुकत्याच भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात पार पडलेल्या टी20 मालिकेत दक्षिण आफ्रिकेचे सहाय्यक फलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहिलेले क्लूजनर यांनी अफगाणिस्तानला सर्वोत्तम संघ बनवण्यासाठी मेहनत घेऊ असा विश्वासही व्यक्त केला आहे.
क्लूजनर नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये अफगाणिस्तान विरुद्ध वेस्ट इंडीज संघात सुरु होणाऱ्या कसोटी आणि मर्यादीत षटकांच्या मालिकांपासून अफगाणिस्तानच्या प्रशिक्षकपदाचा कारभार सांभाळतील.
क्लूजनरने 1996 चे 2004 दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 49 कसोटी आणि 171 वनडे सामने खेळले आहेत. यामध्ये त्यांनी कसोटीत 4 शतके आणि 8 अर्धशतकांसह 1906 धावा केल्या आणि 80 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच वनडेत 3576 धावा करताना 2 शतके आणि 19 अर्धशतके केली आहेत आणि 192 विकेट्स घेतले आहेत.
Former South Africa all-rounder Lance Klusener has been appointed as new Head Coach by the Afghanistan Cricket Board.
Read more: https://t.co/oMxqse76NG@Farhan_YusEfzai pic.twitter.com/pLsCLNDlhU
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) September 27, 2019
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–टी२०मध्ये यष्टीरक्षणात धोनीलाही मागे टाकणाऱ्या या महिला क्रिकेटपटूने घेतली निवृत्ती
–टीम इंडियाचे टेंशन वाढले, रोहित शर्मा झाला शून्यावर आऊट
–युवराज म्हणतो, तर मी अजून एक विश्वचषक खेळलो असतो!