---Advertisement---

ऑस्ट्रेलियाचा हा दिग्गज घेतोय धोनीसारख्या फिनीशरचा शोध

On: बुधवार, मार्च 11, 2020 6:06 PM
---Advertisement---

न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 13 मार्चपासून 3 सामन्यांची वनडे मालिका सुरु होणार आहे. ही मालिका सुरु होण्याआधी ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक जस्टिन लॅंगर (Justin Langer) यांनी सांगितले आहे की, ते निर्धारित षटकांच्या सामन्यात एमएस धोनी  किंवा मायकल बेवनसारख्या फिनिशर्सच्या शोधात आहेत.

आयसीसीने दिलेल्या वृत्तानुसार लॅंगरने म्हटले आहे की, “आम्ही नशीबवान आहोत की आमच्याकडे भूतकाळात माइक हसी आणि बेवनसारखे शानदार फिनिशर होते. धोनीनेही यात प्रभुत्त्व मिळवले आहे. शिवाय इंग्लंड संघाचा जोस बटलरही यात पारंगत आहे.”

“मात्र, ऑस्ट्रेलिया संघाला सध्या अशा फलंदाजाची गरज आहे. संघात ही जागा अजूनही पक्की झालेली नाही. त्यामुळे फलंदाजांना या जागेसाठी चांगली संधी आहे,” असेही ते पुढे म्हणाले.

न्यूझीलंडविरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या वनडे मालिकेतील पहिला सामना सिडनी येथे होणार आहे. तर उर्वरित 2 सामने 15 मार्च रोजी सिडनी आणि 20 मार्च रोजी हॉबर्ट येथे होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

चक्क झेल घेण्यासाठी यष्टीरक्षकाने धरले फलंदाजाचे पाय! पहा व्हिडिओ…

पुजाराच्या वडिलांकडून फलंदाजी शिकणारा ‘हा’ खेळाडू रणजी फायनलमध्ये चमकला

…म्हणून सेहवाग म्हणतो सचिन तेंडूलकरने थकवले!!!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---