जगातील सर्वात मोठी टी२० लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) आगामी हंगाम २६ मार्चपासून सुरू होत आहे. या नव्या हंगामात शानदार कामगिरी करण्यासाठी सर्व संघांनी कंबर कसलेली दिसून येते. पहिल्या आयपीएल हंगामात विजेतेपद मिळवलेल्या राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाने नागपूर येथे आपला कॅम्प देखील सुरू केला आहे. त्याचवेळी संघाने आता श्रीलंकेचा माजी वेगवान गोलंदाज व आयपीएल इतिहासात सर्वाधिक बळी मिळवणारा गोलंदाज असलेल्या लसिथ मलिंगा (Lasith Malinga) याला वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे. (Lasith Malinga Join Rajasthan Royals As Fast Bowling Coach)
राजस्थान रॉयल्स संघाने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम हॅण्डलवरून पोस्ट करत मलिंगा संघाशी जोडला गेल्याची माहिती दिली. श्रीलंकेचा दिग्गज फलंदाज कुमार संगकारा हा या संघाचा मेंटर म्हणून काम पाहतो. त्यानंतर आता मलिंगाच्या येण्याने संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये आणखी एका दिग्गजाची भर पडली आहे.
दैदिप्यमान राहिली कारकीर्द
आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवलेल्या मलिंगाने आयपीएलमध्येही आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. तो २००८ ते २०२० या काळात मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता. त्याच्या नावे आईपीएल इतिहासात सर्वाधिक बळी घेण्याची नोंद आहे. मलिंगाने मागील वर्षी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. मलिंगाने यापूर्वी मुंबई इंडियन्ससाठी २०१८ आयपीएलमध्ये मार्गदर्शकाची भूमिका बजावली आहे. यावर्षी संपूर्ण आयपीएल मुंबई व पुणे येथे होणार असल्याने मुंबईत खेळल्याच्या त्याच्या अनुभवाचा राजस्थान रॉयल्स संघाला नक्कीच फायदा होऊ शकतो.
आयपीएल २०२२ साठी राजस्थान रॉयल्स संघ-
संजू सॅमसन (कर्णधार), जोस बटलर, यशस्वी जयस्वाल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, शिमरॉन हेटमायर, देवदत्त पडिक्कल, प्रसिद्ध कृष्णा, युझवेंद्र चहल, रियान पराग, केसी करिअप्पा, नवदीप सैनी, ओबेद मॅकॉय, अनुनय सिंग, कुलदीप सेन, करुण सेन , ध्रुव जुरेल, तेजस बारोका, कुलदीप यादव, शुभम गढवाल, जिमी नीशम, नॅथन कुल्टर-नाईल, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, डॅरिल मिशेल.
महत्वाच्या बातम्या-
अखेर विनू मंकड यांच्या मुलाला मिळाला न्याय! मंकडींग विरोधातील ‘त्या’ लढ्याला आले यश (mahasports.in)