---Advertisement---

Video: यॉर्करवर उत्तर शोधण्यासाठी परागने घेतली थेट मलिंगाचीच मदत, पाहा रियानचा खास ‘रियाज’

On: मंगळवार, मे 24, 2022 2:31 PM
Lasith-Malinga-Riyan-Parag
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)च्या १५व्या हंगामाच्या प्ले-ऑफच्या सामन्यांना २४ मे पासून सुरुवात होत आहे. २४ मे रोजी पहिली क्वालिफायर लढत गुजरात टायटन्स (Gujrat titans) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) या दोन संघांमध्ये खेळली जाईल. या सामन्यासाठी दोन्ही संघातील खेळाडू विशेष सराव करत असताने दिसत आहेत. राजस्थानचा फलंदाज रियान पराग (Rian Parag) देखील या सामन्यासाठी उत्सुक असून फलंदाजीमध्ये सुधार करण्यासाठी विशेष प्रयत्न करताना हिसत आहे. गुजरातच्या धुरंधर गोलंदाजांविरुद्ध चांगली खेळी करता यावी यासाठी रियान थेट यॉर्कर किंग लसिथ मलिंगाकडून (Lasith Malinga) सल्ला घेताना दिसला.

राजस्थान रॉयल्सने आपल्या इंस्टाग्राम पेजवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये लसिथ मलिंगा फलंदाज रियान परागला यॉर्करवर कसे खेळायचे हे सांगत आहे. राजस्थान रॉयल्सचे गोलंदाजी प्रशिक्षक मलिंगा या युवा फलंदाजाला मार्गदर्शन करताना खूप खूश दिसत आहे. आयपीएलच्या 15 व्या हंगामात रियान यॉर्कर चेंडूंविरुद्ध संघर्ष करताना दिसला होता. ही त्रृटी सोडवण्यासाठी रियानने आता मलिंगाकडून यॉर्कर विरुद्धचे धडे गिरवताना दिसत आहे. फलंदाजी सोबतच रियान एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे.  रियानने यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत 15 झेल घेतले आहेत. आयपीएलच्या एकाच मोसमात सर्वाधिक झेल घेणारा भारतीय म्हणून रियान अग्रस्थानी आहे.

दरम्यान, राजस्थान रॉयल्सचा संघ 2018 नंतर प्रथमच प्लेऑफमध्ये पोहोचण्यात यशस्वी झाला आहे. पहिल्या हंगामाचा चॅम्पियन राजस्थान रॉयल्सचे कर्णधारपद यावर्षी संजू सॅमसनच्या (Sanju Samson) हाती आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील संघाला विजेतेपदाचा दुष्काळ संपवायचा आहे. यंदाच्या हंगामात राजस्थानला विजेतेपद मिळवण्याची चांगली संधी आहे. त्यामुळे राजस्थानचा संघ या संधीचे सोनं करण्यासाठी सज्ज असून विशेष मेहनत घेत असल्याचे स्पष्ट होत आहे.

याआधी 2008 साली शेन वॉर्नच्या नेतृत्वात राजस्थानने ही स्पर्धा जिंकली होती. अगदी काही दिवसांपूर्वीच शेन वॉर्नचे निधन झाले. त्यामुळे राजस्थानचा संघ पुन्हा एकदा विजेतेपदाचा बहुमान मिळवण्यास यशस्वी ठरल्यास ही शेन वॉर्नला खरी श्रद्धांजली ठरू शकते.

हेही वाचा

‘दिनेश कार्तिकला परत संधी दिली, मग शिखर धवनला का नाही’, दिग्गज भारतीय क्रिकेटपटूचा प्रश्न

गॅलॅक्टिकचे सहा गोल, तर संघवी एफसीची बरोबरी

एमएसएलटीए सुहाना स्मार्ट टेनिस सर्किट स्पर्धेत मुंबईच्या तमन्ना नायर, आरव छल्लाणी यांना विजेतेपद

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---