सध्या आशिया चषकाचा 15वा हंगाम शेवटच्या टप्प्यांत आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (11 सप्टेंबर) खेळवला जाणार आहे. या सामन्यात पाकिस्तान आणि श्रीलंका हे दोन संघ आमने-सामने असणार आहेत. अशा परिस्थितीतस अंतिम सामन्यापूर्वीचा सुपर 4 फेरीतील शेवटचा सामना देखील याच दोन संघात खेळवला जात आहे. या सामन्यातदील पहिल्या डावात श्रीलंकेने पाकिस्तानी संघावर दबाज निर्माण करत 19.1 षटकांत केवळ 121 धावा देत पाकिस्तानी संघाचे 10 गडी बाद केले.
या सामन्यात श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू वानिंदू हसरंगा याने श्रीलंकेसाठी सर्वाधिक 3 बळी घेतले. यावेळी त्याने 4 षटकांत केवळ 21 धावा दिल्या. फिरकीपटू महेश थिक्षाणा आणि पदार्पण करणाऱ्या प्रमोद मधुशंका यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. दुसरीकडे पाकिस्तानी संघासाठी कर्णधार बाबर आझमने सर्वाधिक 30 तर मोहम्मद नवाजने 26 धावा केल्या. याशिवाय कोणत्याही फलंदाजाला 20 धावांचा वैयक्तिक धावा करता आल्या नाहीत. त्यामुळे पाकिस्तानी संघाला या सामन्यात मोठी धावसंख्या उभारता आली नाही.
दरम्यान, या सामन्यापूर्वीच दोन्ही संघांनी आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात आपली जागा पक्की केली आहे. त्यामुळे या सामन्याच्या निकालावर आशिया चषकाचा पॉईंट्स टेबलवर काही फरक पडमार नाही. मात्र, फायनलमध्ये भिडण्यापूर्वी प्रतिस्पर्धी संघावर मानसिक दबाव निर्माण करण्यासाठी दोन्ही संघ या सामन्यात प्रयत्न करतील.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘बारा गावचं पाणी’ पिणारा ‘हा’ दिग्गज क्रिकेटपटू पहिल्यांदाच खेळणार ग्रीनपार्कवर; सचिन अव्वलस्थानी
टी20 विश्वचषकात विराटने ‘या’ क्रमांकावर फलंदाजी करावी, ‘द ग्रेट वॉल’ने दिला सल्ला
जडेजाच्या विरोधात रचला गेला कट? ‘त्यामुळे’ नाही खेळणार टी-20 विश्वचषक