Loading...

विंडीजच्या शेवटच्या भारत दौऱ्यावेळी सचिन, धोनी आणि रोहितबद्दल झाला होता खास योगायोग

विंडीजचा संघ २०१३ मध्ये भारतात शेवटचा कसोटी सामना खेळली होती. हा सामना १४ ते १८ नोव्हेंबर २०१३ रोजी मुंबईमधील वानखेडे स्टेडियमवर झाला होता.

२०१३ मध्ये विंडीज संघ भारताविरुद्ध २ कसोटी आणि ३ वनडे सामने खेळला होता. त्यातील पहिला कसोटी सामना कोलकाता येथे झाला होता. तो भारताने १ डाव आणि ५१ धावांनी जिंकला होता.

तर दुसरा सामना मुंबईला झाला होता. हा सामना भारताने एक डाव आणि १२६ धावांनी जिंकला होता.

यानंतर विंडीज कसोटी क्रिकेटमध्ये एकूण ४३ सामने खेळला परंतु यातील एकही सामना भारतात झाला नाही.

सचिनचा शेवटचा कसोटी सामना- 

Loading...

२०१३ भारत दौऱ्यातील विंडीजचा मुंबई कसोटी सामना सचिनच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा सामना होता. सचिनच्या या २००व्या सामन्यात त्याने ७४ धावा केल्या होत्या.

रोहित शर्माचे पदार्पण-

Loading...

याच मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात रोहितने कसोटी पदार्पण केले होते. इडन गार्डन मैदानावर झालेल्या सामन्यात त्याने १७७ धावा केल्या होत्या तर मुंबई कसोटीत नाबाद १११ धावा केल्या होत्या. या मालिकेत त्याने २८८ च्या सरासरीने २८८ धावा केल्या होत्या.

धोनीचा कर्णधार म्हणुन भारतातील शेवटचा कसोटी सामना- 

मुंबई कसोटी सामना धोनीचा कसोटी कर्णधार म्हणुन भारतातील शेवटचा कसोटी सामना होता. त्यानंतर धोनीने कधीही भारतात कसोटी कर्णधार म्हणुन तसेच खेळाडू म्हणुन कसोटी सामना खेळला नाही. त्यानंतर त्याने डिसेंबर २०१४मध्ये कसोटीतून कर्णधार तसेच खेळाडू म्हणुन निवृत्ती घेतली.

महत्त्वाच्या बातम्या-

You might also like
Loading...