पुणे। अजिंक्य क्रिकेट क्लब यांच्या वतीने आयोजित स्वर्गीय बल्लाळ चिपळूणकर 12 वर्षाखालील क्रिकेट करंडक स्पर्धेत ओम साई क्रिकेट अकादमी संघाने अजिंक्य क्रिकेट क्लब संघाचा 200 धावांनी पराभव करत स्पर्धेत मोठा विजय मिळवला.
ए.के स्पोर्ट्स क्लब साळुंबरे येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत भाविका अहिरेच्या अफलातून फलंदाजीच्या जोरावर ओम साई क्रिकेट अकादमी संघाने अजिंक्य क्रिकेट क्लब संघाचा 200 धावांनी दणदणीत पराभव केला. पहिल्यांदा खेळताना ओम साई क्रिकेट अकादमी संघाने 20 षटकात केवळ 1 गडी गमावत 251 धावांचा डोंगर रचला. भाविका अहिरेने अवघ्या 72 चेंडूत 19 चौकारांसह 125 धावांची दमदार खेळी केली. यश रसाळने नाबाद खेळी करत 50 चेंडूत 8 चौकारांसह 64 धावांसह भाविकाला सुरेख साथ दिली. 251 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुकुंद बाबर व अर्चित कुर्हेकर यांच्या अचूक गोलंदाजीपुढे अजिंक्य क्रिकेट क्लब संघ 19.1 षटकात सर्वबाद 51 धावांत गारद झाला. भाविका अहिरे सामनावीर ठरली.
दुस-या सामन्यात विहान राजनाळेच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर 30 यार्ड्स ए संघाने स्कोअर स्पोर्ट्स अकादमी संघाचा10 धावांनी पारभव केला. पहिल्यांदा खेळताना भाव्य वडोदरीयाच्या 35 तर विहान बागडच्या 16 धावांसह 30 यार्ड्स ए संघाने 20 षटकात 7 बाद 99 धावा केल्या. 99 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विहान राजनाळे ,ओजस अलटेकर व दक्ष किरोदीयन यांच्या अचूक गोलंदाजीने स्कोअर स्पोर्ट्स अकादमी संघाचा डाव 18.4 षटकात सर्वबाद 89 धावांत रोखून संघाला विजय मिळवून दिला. 12 धावात 3 गडी बाद करणारा विहान राजनाळे सामनावीर ठरला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी
ओम साई क्रिकेट अकादमी- 20 षटकात 1 बाद 251 धावा(भाविका अहिरे 125(72, 19×4), यश रसाळ नाबाद 64(50, 8×4), अक्षत गणेश 1-53) वि.वि अजिंक्य क्रिकेट क्लब- 19.1 षटकात सर्वबाद 51 धावा(अनिकेत रवीदास 14(14, 3×4), मुकुंद बाबर 3-9, अर्चित कुर्हेकर 2-18) सामनावीर- भाविका अहिरे; ओम साई क्रिकेट अकादमी संघाने 200 धावांनी सामना जिंकला.
30 यार्ड्स ए- 20 षटकात 7 बाद 99 धावा(भव्य वडोदरीया 35(42, 8×4), विहान बागड 16(35, 2×4), जय पांडे 2-20) वि.वि स्कोअर स्पोर्ट्स अकादमी- 18.4 षटकात सर्वबाद 89 धावा(राज पडवळ 19(11, 1×4), नैतिक पाटील 11(19, 1×4), विहान राजनाळे 3-12, ओजस अलटेकर 3-21, दक्ष किरोदीयन 2-13) सामनावीर- विहान राजनाळे; 30 यार्ड्स ए संघाने 10 धावांनी सामना जिंकला.
महत्त्वाच्या बातम्या –
टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेत 18 व्या मानांकित कारास्तेवसह अव्वल 100 खेळाडूमधील आठ खेळाडूंचे आकर्षण
हार्दिकला मुंबई इंडियन्सने संघात का केले नाही रिटेन? झहीर खानने दिले उत्तर