---Advertisement---

दिवंगत वॉर्नला मिळाला मानाचा पुरस्कार! क्रीडाक्षेत्रातील दिग्गजांच्या यादीत झाला समावेश

Shane-Warne
---Advertisement---

ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू शेन वॉर्न याचे यावर्षी मार्च महिन्यात निधन झाले. कसोटी क्रिकेट इतिहासात सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये त्याचा दुसरा क्रमांक लागतो. त्याच्या अकाली निधनानंतर अनेकांनी हळहळ व्यक्त केली होती. त्यानंतर आता ऑस्ट्रेलियामध्ये त्याचा आणखी एक मोठा पुरस्कार देऊन सन्मान केला गेला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ट्विट करत याबाबतची माहिती दिली.

 

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या वॉर्नला स्पोर्ट ऑस्ट्रेलिया हॉल ऑफ फेममध्ये ‘लिजेंड’चा दर्जा देण्यात आला. याची घोषणा करताना क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ट्विट केले की, ‘कुणाला शंका आहे का? महान शेन वॉर्नला स्पोर्ट ऑस्ट्रेलिया हॉल ऑफ फेममध्ये लिजेंडचा दर्जा देण्यात आला आहे.’

 

वॉर्नने 2007 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता. त्यानंतर आयपीएलच्या पहिल्या सत्रात म्हणजे 2008 मध्ये, वॉर्नने राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व केले आणि संघाला विजेतेपद मिळवून दिले. स्पोर्ट ऑस्ट्रेलिया हॉल ऑफ फेममध्ये वॉर्नआधी फक्त चार ऑस्ट्रेलियन खेळाडूंना हा मान मिळाला होता. यामध्ये सर डॉन ब्रॅडमन, कीथ मिलर, रिची बेनो व डेनिस लिली यांचा समावेश आहे.

वॉर्नने ऑस्ट्रेलियासाठी 145 कसोटी सामने खेळले आणि 708 बळी घेतले. त्याचबरोबर या अनुभवी लेगस्पिनरने वनडेमध्ये 194 सामने खेळले असून, 293 बळी घेतलेले आहेत. वॉर्न हा 1999 मध्ये विश्वचषक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाचा भाग होता. वॉर्न त्याच्या खेळासाठी जितका प्रसिद्ध झाला तितकाच तो वादांमुळे चर्चेत राहिलेला.

(Late Shane Warne Include In Sports Australia Hall Of Fame Legend)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आपल्याच खेळाडूला कोट्यावधी कमावण्यापासून रोखत आहेत ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक, वाचा संपूर्ण प्रकरण
ऑस्ट्रेलियन संघात ‘या’ दोन फास्ट बॉलर्सची एंट्री, दोघेही करतात वाऱ्याच्या वेगाने गोलंदाजी 

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---