पुणे । पीवायसी हिंदू जिमखाना व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)तर्फे आयोजित सातव्या शशी वैद्य मेमोरियल आंतर क्लब टेनिस अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत लॉ चार्जर्स, फर्ग्युसन कॉलेज अ, एमडब्लूटीए क, सोलारिस आरपीटीए, मगरपट्टा ब या संघानी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून विजय मिळवला.
पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत प्लेटडिव्हिजन गटात लॉचार्जर्स संघाने केपीआयटी संघाचा 23-14 असा पराभव सलग दुसरा विजय मिळवला.
100अधिक गटात भूषण तळवलकरने नितीन खैरेच्या साथीत किशोर पाटील व राजेंद्र कांगो यांचा 6-3 असा तर, खुल्या गटात विक्रांत गणी व केदार राजपाठक यांनी राजेश सिरसकर व अम्ब्रिश सेठी या जोडीचा 6-2असा पराभव करून आघाडी मिळवून दिली.
त्यानंतर 90अधिक गटात नितीन गवळी व श्रेयश लोघाटे या जोडीला केपीआयटीच्या महेंद्र व्ही व निळकंठी रघु यांनी टायब्रेकमध्ये 5-6(7-4)असे पराभूत करून हि आघाडी कमी केली.
खुल्या गटात लॉ चार्जर्सच्या नितीन खैरे व श्रीनिवास रामदुर्ग या जोडीने यामिनी गर्दे व राजेंद्र कांगो यांचा 6-3असा पराभव करून संघाला विजय मिळवून दिला.
दुसऱ्या सामन्यात रवींद्र पांडे, नाम जोशी, संजीव घोलप, सचिन खिलारे, राजेंद्र देशमुख, रवींद्र कत्रे, हेमंत भोसले यांनी केलेल्या विजयी कामगिरीच्या जोरावर सोलारिस आरपीटीए संघाने हिलसाईड जिमखानाचा 24-5असा पराभव करून सलग दुसरा विजय नोंदविला.
एमडब्लूटीए क संघाने ओडीएमटी ब संघावर 24-5असा विजय मिळवला. फर्ग्युसन कॉलेज अ संघाने सोलारिस अ संघाचे आव्हान 24-10असे मोडीत काढले. मगरपट्टा ब संघाने सोलारिस ब संघाला 22-13असे नमविले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी: प्लेट डिव्हिजन:
एमडब्लूटीए क वि.वि.ओडीएमटी ब 24-5(100अधिक गट: राजाराम कृष्णस्वामी/अजय चौहान वि.वि.उमेश दळवी/ज्ञानेश्वर कारकर 6-1; खुला गट: अजय चौहान/शायनी बरेतो वि.वि.हिमांशू कपटिया/कौस्तुभ देशमुख 6-2; 90अधिक गट: संजय आशेर/राहुल सिंग वि.वि.राम नायर/अमित धंद 6-2; खुला गट: पार्थ मोहापात्रा/विक्रम गुलानी वि.वि.प्रितेश श्रीवास्तव/राहुल पाटील 6-0);
फर्ग्युसन कॉलेज अ वि.वि.सोलारिस अ 24-10(100अधिक गट: राजेश जोशी/पंकज यादव वि.वि.मनोज पालवे/संदीप आगटे 6-4; खुला गट: गणेश देवठिले/सचिन साळुंके वि.वि.सौरभ कारखानीस/ बापू पायगुडे 6-1;90अधिक गट: धनंजय खवडे/संजय रासकर वि.वि.राजू पिंपळे/महेंद्र गोडबोले 6-0; खुला गट: पुष्कर पेशवा/आदित्य अभ्यंकर वि.वि.संदीप आगटे/संतोष दळवी 6-5 (8-6));
मगरपट्टा ब वि.वि.सोलारिस ब 22-13(100अधिक गट: प्रदीप मित्रा/रतिश मोहन वि.वि.वसंत साठे/गिरीश साने 6-3; खुला गट: अमन ताहिम/दिव्यांशु वर्मा वि.वि.प्रसाद शिरीमनी/आशिष कुबेर 6-4; 90अधिक गट: मयूर पारीख/कृष्णन अय्यर वि.वि.नितीन बर्वे/आशय गोखले 6-0; खुला गट: रतिश मोहन/प्रदीप जगपाळे पराभूत वि.अश्विन हळदणकर/गिरीश साने 4-6);
सोलारिस आरपीटीए वि.वि.हिलसाईड जिमखाना 24-5(100अधिक गट: रवींद्र पांडे/नाम जोशी वि.वि.सुनील रायसन/प्रवीण चोरडिया 6-1; खुला गट: रवींद्र पांडे/संजीव घोलप वि.वि.गौरव चोरडिया/निखिल कोठारी 6-3; 90अधिक गट: सचिन खिलारे/राजेंद्र देशमुख वि.वि.राजकुमार चोरडिया/मधुसूदन मुंदडा 6-1; खुला गट: रवींद्र कत्रे/हेमंत भोसले वि.वि.शिशिर जोशी/मयूर संचेती 6-0);
लॉ चार्जर्स वि.वि.केपीआयटी 23-14(100अधिक गट: भूषण तळवलकर/नितीन खैरे वि.वि.किशोर पाटील/राजेंद्र कांगो 6-3; खुला गट: विक्रांत गणी/केदार राजपाठक वि.वि.राजेश सिरसकर/अम्ब्रिश सेठी 6-2; 90अधिक गट: नितीन गवळी/श्रेयश लोघाटे पराभूत वि.महेंद्र व्ही/निळकंठी रघु 5-6(7-4); खुला गट: नितीन खैरे/श्रीनिवास रामदुर्ग वि.वि.यामिनी गर्दे/राजेंद्र कांगो 6-3).