टी-20 विश्वचषक 2022 च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला पाच विकेट्सने पराभूत करून इंग्लंड विश्वविजेता बनला. ही दुसरी वेळ आहे, जेव्हा इंग्लंडचने टी-20 विश्वचषक जिंकला आहे. या विजयानंतर क्रीडाजगाताली दिग्गज आणि जाणकार इंग्लंडचे कौतुक करत आहेत. तर दुसरीकडे भारतीय संघाला मात्र टीकाकारांना सामोरे जावे लागत आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन यानेही भारतीय संघ आणि बीसीसीआयवर सडकून टीका केली आहे.
इंग्लंडने टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात भारताला 10 विकेट्सच्या अंतराने पराभूत केले आणि अंतिम सामन्यात जागा पक्की केली. अंतिम सामन्यात पाकिस्तान संघाचे प्रदर्शन अपेक्षित नव्हते आणि इंग्लंडने हा सामना देखील नावावर केला. भारतीय संघ अंतिम सामन्यात पोहोचू शकला नसल्यामुळे अनेकजण संघ व्यवस्थापन आणि खेळाडूंवर टीका करत आहेत. मायकल वॉन (Michael Vaughan) याने थेट भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयवर टीका केली आहे. बीसीसीआय सध्या जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे आणि वॉनच्या मते त्यांना यांच गोष्टीचा अहंकार असावा. वनच्या मते बीसीसीआयने त्यांचा अहंकार बाजूला सारून इंग्लंडकडून गोष्टी शिकल्या पाहिजेत.
एका वृत्तसंस्थेने वॉर्नच्या हवाल्याने माहिती दिली, ज्यात तो म्हणतो की, “मर्यादित षटकांमध्ये खेळणारे इंग्लंडचे हे खाळाडू असाधारण आहेत. अशात इंग्लंड जर ट्रेंड सेट करणारा संघ असेल तर, इतर सर्व संघांनी त्यांचे अनुकरण केले पाहिजे. इंग्लिश क्रिकेट कसे चालले आहे? ते काय करत आहेत? हे इतरांनी पाहिले पाहिजे. जर मी स्वतः भारतीय क्रिकेट चालवत असतो, तर मी अहंकार बाजूला ठेवून इंग्लंडकडून प्रेरणा घेतली असती.”
धोनीप्रमाणे बटलर बनवू शकतो स्वतःचा वारसा –
वॉनला त्यांच्या संघाचा कर्णधार जोस बटलर पुढच्या मोठ्या काळासाठी संघाचे नेतृत्व करू शकतो, असेही सांगितले. यावेळी त्यांनी माजी भारतीय कर्णधार एमएस धोनी () याच्याशी बटलरची तुलना केली. तो म्हणाला की, “जोस बटलर 32 वर्षांचा असताना विश्वचषक विजेता बनला आहे. त्याच्याकडे स्वतःचा वारसा तयार करण्याची संधी आहे. धोनीने अनेक वर्ष भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. जोस बटलर देखील असे करू शकतो. तो सध्या एका फॉरमॅटवर जास्त लक्ष देत आहे.” (‘Leave ego and take inspiration from England’, Michael Vaughan’s scathing criticism of Team India)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमल ठरला 2022 खेलरत्न पुरस्काराचा मानकरी
विश्वचषक तर जिंकलाच, पण आता आयपीएलही जिंकायला निघाला इंग्लंडचा ‘हा’ पठ्ठ्या; म्हणाला, ‘मी आता…’