जगातील दिग्गज टेनिसपटूंमध्ये स्पेनच्या राफेल नदाल याचा समावेश होतो. नदालबाबत मोठी बातमी समोर येत आहे. नदाल एटीपी रँकिंगच्या टॉप-10 यादीतून बाहेर पडला आहे. विशेष म्हणजे, मागील 18 वर्षांमध्ये असे पहिल्यांदाच घडले आहे, जेव्हा हा दिग्गज खेळाडू टॉप-10च्या यादीतून बाहेर पडला आहे. ताज्या क्रमवारीत त्याला 13वे स्थान मिळाले आहे. दुखापतीमुळे सातत्याने स्पर्धांमधून बाहेर राहिल्यामुळे नदालला हा धक्का बसला आहे.
राफेल नदाल (Rafael Nadal) याला जानेवारी 2023मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन (Australian Open) स्पर्धेच्या दुसऱ्या राऊंडमधून बाहेर पडावे लागले होते. दुखापतीमुळे तो स्पर्धेबाहेर झाला होता. तेव्हापासून आतापर्यंत त्याने मैदानात पुनरागमन केले नाहीये. असे म्हटले जात आहे की, मे महिन्यात सुरू होणाऱ्या फ्रेंच ओपन स्पर्धेपूर्वी तो टेनिस कोर्टमध्ये पुनरागमन करेल. पुढील महिन्यापासून सुरू होणाऱ्या मोंटे कार्लो मास्टर्समध्ये तो दिसू शकतो.
Rafael Nadal is out of the @ATPTour Top 10 for the first time since April 2005 ???? pic.twitter.com/EYtE3xs1wn
— US Open Tennis (@usopen) March 20, 2023
सर्वाधिक ग्रँड स्लॅम जिंकणारा खेळाडू
राफेल नदाल हा सर्वाधिक ग्रँड स्लॅम जिंकणारा पुरुष खेळाडू आहे. त्याने आतापर्यंत 22 ग्रँड स्लॅम जिंकले आहेत. नुकतेच नोवाक जोकोविच (Novak Djokovic) याने नदालच्या 22 ग्रँड स्लॅम जिंकण्याच्या विक्रमाची बरोबरी केली होती. या दोघांमध्ये टेनिस जगतात सर्वाधिक ग्रँड स्लॅम जिंकण्याची शर्यत सुरू आहे. मे महिन्यात सुरू होणाऱ्या फ्रेंच ओपनमध्ये या दोन्हींपैकी एक खेळाडू पुढे जाऊ शकतो.
फ्रेंच ओपनमध्ये दबदबा
फ्रेंच ओपनमध्ये राफेल नदाल याचा दबदबा कायम राहिला आहे. त्याने 22 ग्रँड स्लॅममधील 14 किताब फ्रेंच ओपनमध्ये जिंकले आहेत. इथे त्याला पराभूत करणे कोणत्याही खेळाडूसाठी सोपी गोष्ट नाहीये. तसं पाहता, नदाल मेपर्यंत पूर्णत: फिट झाला नाही, तर जोकोविचकडे ग्रँड स्लॅम जिंकण्याच्या शर्यतीत सर्वाधिक पुढे जाण्याची संधी असेल. आता ही कामगिरी जोकोविच यशस्वीरीत्या करेल की नाही, हे आगामी काळातच कळेल. (legend spanish tennis player rafael nadal out of top 10 atp rankings for the first time in 18 years)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ब्रेंडा फ्रुविर्तोव्हाने जिंकली केपीबी ट्रस्ट आयटीएफ महिला ओपन! अंकिता रैना उपविजेती
अंकिता-प्रार्थना जोडीचा KPB ट्रस्ट ITF महिला ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश






