---Advertisement---

वयाची पर्वा कुणाला! ५६व्या वर्षी पाकिस्तानी गोलंदाजाचा कहर, जबराट यॉर्करने उडवल्या इंग्लिश फलंदाजाच्या दांड्या

On: सोमवार, जून 20, 2022 11:52 AM
---Advertisement---

सिंह कितीही म्हातारा झाला तरी शिकार करायला विसरत नाही. ही म्हण पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रमवर अगदी तंतोतंत बसते. वसीम अक्रम (Wasim Akram) याने क्रिकेटला खूप आधी निरोप दिला असेल, पण अजूनही त्याच्या गोलंदाजीची धार कमी झालेली नाही. हेच कारण आहे की, अक्रम नुकताच एका चॅरिटी सामन्यामध्ये खेळायला आला तेव्हा त्याने आपल्या शानदार इन-स्विंग यॉर्करने इंग्लंडचा माजी कर्णधार माईक (Mike Atherton) आथर्टनचा त्रिफळा उडवला.

वसीमच्या या शानदार गोलंदाजीचा व्हिडिओ क्रिकेट डिस्ट्रिक्टने आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे. जो आता प्रचंड व्हायरल होत आहे. अक्रमनेही या व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. अक्रमने आथर्टनला टॅग केले आणि लिहिले, “माफ करा माइक आथर्टन, आपण म्हातारे होऊ शकतो पण काही गोष्टी कधीच बदलत नाहीत.”

या व्हिडिओमध्ये अक्रमने माजी इंग्लिश कर्णधार आथर्टनला इन स्विंग यॉर्कर टाकत बाद केल्यानंतर त्याच्या जुन्या पद्धतीने विकेट साजरी करताना दिसत आहे. यादरम्यान पॅव्हेलियनमध्ये परतताना तो आथर्टनच्या बॅटला थोपवतो. अक्रम आणि आथर्टन ९० च्या दशकात एकमेकांसमोर आले आहेत. एवढेच नाही तर इंग्लिश कौंटी संघ लँकाशायरकडून खेळताना दोन्ही खेळाडूंनी ड्रेसिंग रूम शेअर केली होती.

https://twitter.com/wasimakramlive/status/1538591395321085957?s=20&t=dQG99tQfzpdlNRiEWLL48A

दिवंगत शेन वॉर्नच्या स्मरणार्थ एक चॅरिटी मॅच आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये वसीम अक्रम, वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लारा, इंग्लंडची माजी महिला कर्णधार शार्लोट एडवर्ड्स, इयान बेल, मॉन्टी पानेसर, मायकेल आथर्टन आणि नील जॉन्सन यांनी सहभाग घेतला होता. दोन वेळचा विश्वविजेता क्लाइव्ह लॉईड या सामन्यात अंपायरिंग करताना दिसला.

वसीम अक्रमने २००३ मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. पाकिस्तानकडून खेळताना वसीमच्या नावावर कसोटीत ४१४ आणि वनडेत ५०२ विकेट्स आहेत. फलंदाजीतही त्याने कसोटी आणि वनडे मिळून ६५०० अधिक धावा केल्या आहेत. त्याची गणना जगातील महान वेगवान गोलंदाजांमध्ये केली जाते.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

विराटचा फॉर्म कसा येणार माघारी? ग्लेन मॅकग्रांनी दिला मोलाचा सल्ला

कसोटी क्रिकेटमध्ये ११ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त विराट कोहलीने अनलॉक केला आपला लॅपटॉप

कार्लोस ब्रेथवेटने फलंदाजाला मारलेला चेंडू संघाला पडला महागात, गमवावा लागला सामना

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---