---Advertisement---

दु:खद बातमी! महान हॉकीपटू केशव दत्त कालवश, आर्मींसाठी सुवर्णपदक केले होते दान

On: बुधवार, जुलै 7, 2021 1:32 PM
---Advertisement---

भारतीय क्रिडाजगताला अनेक दिग्गज क्रिडापटूंचा वारसा लाभला आहे. त्यातीलच एक नाव, महान हॉकीपटू केशव दत्त यांचे. २ वेळा ऑलिंपिकचे सुवर्णपदक जिंकणाऱ्या केशव दत्त यांचे बुधवारी (०७ जुलै) निधन झाले आहे. ते ९५ वर्षांचे होते. वृद्धापकाळाशी संबंधित आजारामुळे कोलकाताच्या संतोषपुर येथे आपल्या राहत्या घरी रात्री १२.३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

सन १९४८ मध्ये लंडन ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या स्वतंत्र्य भारतीय संघाचा ते भाग होते. भारत आणि चीन यांच्यात झालेल्या युद्धानंतर त्यांनी आर्मी फंडमध्ये हे सुवर्णपदक दान दिले होते. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यानंतर १९४८ आणि १९५२ मध्ये देशाला ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देण्यात महत्वाचे योगदान दिले होते.

केशव दत्त यांच्या निधनानंतर सर्वच स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे. अगदी पश्चिच बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही केशव दत्त यांच्या निधनानंतर दु:ख व्यक्त केले आहे. ट्विट करत त्यांनी लिहिले आहे की, ‘आज आपण हॉकीच्या जगातील खरा महान खेळाडू गमावला आहे. केशन दत्त यांच्या निधनाचे वृत्त ऐकून खूप वाईट वाटले. त्यांनी १९४८ आणि १९५२ मध्ये देशाला सुवर्णपदक जिंकून दिले होते. ते भारत आणि बंगालचे चँपियन होते.’

महत्त्वाच्या बातम्या-

सुट्टीतही कर्णधार कोहलीचे ‘मिशन इंग्लंड’वर लक्ष, वजनदार डंबल्स उचलत केली कसरत

श्रीलंकेहून आली आनंदाची बातमी, हार्दिक पंड्या ‘बहुप्रतिक्षित’ भूमिकेत मैदानावर उतरणार

सुरेख भेट! जाळ अन् धूर संगठच काढत चाहत्याने धोनीसाठी बनवले अतिसुंदर गिफ्ट; एकदा पाहाच

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---