भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज सूर्यकुमार यादव सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून, तो सातत्याने शानदार खेळ दाखवत आहे. रविवारी (2 ऑक्टोबर) खेळल्या गेलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात त्याने आक्रमक अर्धशतक झळकावले. त्याने 21 चेंडूत 61 धावांची तुफानी खेळी खेळली. सूर्यकुमारचे हे टी20 मधील सलग तिसरे अर्धशतक आहे. सूर्यकुमारला गोलंदाजी करणे, सध्या जगभरातील सर्वच गोलंदाजांना कठीण जातेय. अशा परिस्थितीत दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज मखाया एन्टिनीने सूर्यकुमारविरुद्ध कोणत्या प्रकारची गोलंदाजी करायला हवी, याबाबत आपले मत मांडले आहे.
सूर्यकुमारने गुवाहाटी येथील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अवघ्या 18 चेंडूत अर्धशतक झळकावले. आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये भारतासाठी हे दुसरे सर्वात जलद अर्धशतक ठरले. त्याने एकूण 22 चेंडूंचा सामना करत 61 धावा चोपल्या. त्याची ही खेळी 5 चौकार व 5 षटकारांनी सजली होती.
सूर्यकुमारने नुकतीच एका क्रिकेट संकेतस्थळाशी चर्चा केली. यामध्ये त्याला सूर्यकुमारच्या फॉर्मविषयी व त्याला तू कशाप्रकारे गोलंदाज विचारला होता. त्यावर उत्तर देताना एन्टिनी म्हणाला,
“सध्या तो ज्याप्रकारे फलंदाजी करत आहे ते पाहून कोणालाही वेगवेगळ्या योजना बनवाव्यात लागतील. मी असतो तर, त्याला योग्य लेन्थने गोलंदाजी केली असती. जेणेकरून तो चौकार मारू शकला नसता. उजव्या स्टंप बाहेर गोलंदाजी देखील त्याला लाईन व लेंथचा योग्य अभ्यास करूनच करावी लागेल.”
मखाया एन्टिनी हा दक्षिण आफ्रिकेचा सर्वकालीन महान वेगवान गोलंदाज म्हणून ओळखले जातात. त्यांनी आपल्या कारकिर्दीत तब्बल 662 बळी मिळवले आहेत.
सूर्यकुमारने गेल्या तीन सामन्यांमध्ये सलग अर्धशतके ठोकली आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात सूर्यकुमारने 69 धावा केल्या होत्या. यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या टी20 सामन्यात त्याने नाबाद 50 धावांची खेळी केलेली. तर गुवाहाटी येथील दुसऱ्या टी-20 मध्ये 61 धावांची आक्रमक खेळी त्याच्या बॅटमधून आली होती. त्याचा हा फॉर्म भारतीय संघासाठी विश्वचषकाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
VIDEO: ‘ते 17 वर्षांनंतर आले तर त्यांना रिकाम्या…’ पाकिस्तान हरल्यावर हे काय बोलून गेले पीसीबी अध्यक्ष
T20WC: बुमराहबद्दल ऑस्ट्रेलियन दिग्गजाचे मोठे भाष्य! म्हणाला, ‘भारताला जिंकण्यासाठी त्याचे संघात…’