---Advertisement---

लिजेंड्स लीगचे संघ जाहीर! सेहवाग-इरफानचे संघ मजबूत; तर भज्जी-गौतीच्या वाट्याला हे दिग्गज

On: शनिवार, सप्टेंबर 3, 2022 10:58 PM
---Advertisement---

लिजेंड्स लीग क्रिकेटचा दुसरा हंगाम लवकरच सुरू होणार आहे. यावर्षी स्पर्धेत एकूण चार संघ खेळताना दिसतील. या फ्रँचायझी क्रिकेट लीगसाठी नुकताच पार पडला. भारतात ही स्पर्धा १६ सप्टेंबरनंतर चार शहरांमध्ये खेळवली जाईल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेले अनेक दिग्गज क्रिकेटपटू यात खेळताना दिसणार आहेत. आता या लीगसाठी सर्व संघांची अंतिम यादी जाहीर झाली आहे.

लीगमधील चारही संघांचे कर्णधार भारतीय आहेत. गुजरात जायंट्सचा कर्णधार वीरेंद्र सेहवाग असेल. त्याचबरोबर इंडिया कॅपिटल्स संघाचे कर्णधारपद गौतम गंभीरकडे सोपवण्यात आले आहे. हरभजन सिंग मणिपाल टायगर्सचा कर्णधार असेल. तर इरफान पठाणची भिलवाडा किंग्सच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

गुजरात जायंट्स-

वीरेंद्र सेहवाग (कर्णधार), पार्थिव पटेल, अजंता मेंडिस, मनविंदर बिस्ला, अशोक डिंडा, लेंडल सिमन्स, डॅनियल व्हेटोरी, केविन ओ’ब्रायन, स्टुअर्ट बिन्नी, मिचेल मॅक्लनघन एल्टन चिगुंबुरा, ख्रिस ट्रेमलेट, रिचर्ड लेव्ही, जोगिंदर शर्मा, ग्रॅम स्वान.

 

इंडिया कॅपिटल्स-

गौतम गंभीर (कर्णधार), मश्रफे मोर्तजा, हॅमिल्टन मसाकात्झा, रजत भाटिया, लियाम प्लंकेट, मिचेल जॉन्सन, असगर अफगान, रवि बोपारा, प्रवीण तांबे, दिनेश रामदीन, परवेज माहरूफ, जॅक कॅलिस, पंकज सिंह, जॉन मूनी, प्रोस्पर उत्सैया, रॉस टेलर.

 

भिलवाडा किंग्स-

इरफान पठाण (कर्णधार), यूसुफ पठाण, मॉन्टी पानेसर, नमन ओझा, विलियम पोर्टरफील्ड, शेन वॉटसन, एस श्रीसंत, निक कॉम्पटन, मॅट प्रायर, समित पटेल, फिडेल एडवर्ड्स, सुदीप त्यागी, टीनो बेस्ट, ओवेस शाह, टिम ब्रेस्नन.

 

मनिपाल टायगर्स-

हरभजन सिंह (कर्णधार), ब्रेट ली, मुथय्या मुरलीधरन, फिल मस्टर्ड, मोहम्मद कैफ, परविंदर अवाना, रितिंदर सिंह सोढ़ी, रोमेश कालुवितरना, दिमित्री मस्करेनहास, लान्स क्लूजनर, रेयान साइडबॉटम, वीआरवी सिंह.

 

या स्पर्धेच्या दरम्यानच इंडिया महाराजा व रेस्ट ऑफ वर्ल्ड हा सामना देखील खेळला जाईल. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हा सामना खेळला जाणार आहे. ‌

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---