भारतीय संघ इंग्लंड विरुद्ध (INDvs ENG) कसोटी सामना खेळण्यापूर्वी लिसेस्टरशायर विरुद्ध सराव सामना खेळत आहेत. चार दिवसाच्या या सराव सामन्याला गुरूवारी (२३ जून) सुरूवात झाली. हा सामना लिसेस्टरच्या काउंटी ग्राउंडवर खेळला जात आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय चांगलाच अंगलट आल्याचे निदर्शनास आले होते कारण भारताचा अर्धा संघ पहिल्याच दिवशी तंबूत परतला आहे.
या सामन्यात रोहित आणि शुबमन गिलने सलामीला येत चांगली सुरूवात करण्याचा प्रयत्न केला. यावेळी रोमन वॉल्कर (Roman Walker) या २१वर्षीय गोलंदाजाने प्रतिभावान कामगिरी करत सगळ्यांना हैराण केले आहे. त्याने एक-एक करत भारताच्या प्रमुख फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला आहे. या सराव सामन्यात त्याने सर्वप्रथम भारताचा कर्णधाराची विकेट घेतली. रोहित २५ धावावर असताना त्याने आखूड टप्प्याच्या चेंडूवर उंच शॉट मारला असता अबी सकांडेला झेल देत बाद झाला. नंतर त्याने हनुमा विहारीला बाद केले. त्याने तीनच धावा केल्या होत्या.
पहिल्या चार विकेट लवकर गमावल्यावर विराट कोहली (Virat Kohli) आणि रवींद्र जडेजा यांनी धावफलक हलता ठेवण्याचा प्रयत्न सुरू ठेवला. त्यातच जडेजाने विकेट गमावली. वॉकरने जम बसलेल्या कोहलीला पण पायचीत केले. त्याने ३३ धावा केल्या होत्या. शार्दुल ठाकुरला बाद करत या युवा गोलंदाजाने त्याच्या पाच विकेट्स पूर्ण केल्या. त्याच्याविरुद्ध भारतीय फलंदाजांनी १३ धावा केल्या. त्याने ५ षटके निर्धाव टाकली.
☝️ | Thakur (6) bowled Walker. 🎳
The @BCCI all-rounder shoulders arms to a straight one that goes on to crash into the stumps.
5⃣-fer for @RomanWalker17. 👏
🇮🇳 IND 148/7
𝐋𝐈𝐕𝐄 𝐒𝐓𝐑𝐄𝐀𝐌: https://t.co/adbXpwig48 👈
🦊 #IndiaTourMatch | #LEIvIND pic.twitter.com/8i479wIaKb
— Leicestershire CCC 🏏 (@leicsccc) June 23, 2022
महत्वाचे म्हणजे वॉकरने एकही प्रथम श्रेणीचा सामना खेळलेला नाही. त्याने फक्त दोन लिस्ट ए सामने खेळले आहेत. या सामन्यात त्याने एक विकेट घेतली होती. त्याने व्हायटॅलीटी ब्लास्टमध्ये लिसेस्टरशायरकडून १३ टी२० सामने खेळले आहेत. २०१८च्या १९ वर्षाखालील विश्वचषकाच्या इंग्लंड संघामध्ये त्याचा समावेश होता. या स्पर्धेत त्याला अधिक सामने खेळण्याची संधी मिळाली नाही.
सराव सामन्याच्या पहिल्या दिवसाखेर वॉकरने ११ षटके टाकत २४ धावा देत ५ विकेट्स घेतल्या. या सामन्यात लिसेस्टरशायरकडून जसप्रीत बुमराह आणि प्रसिद्ध कृष्णा खेळत आहेत. यावेळी बुमराहला ९ षटके टाकूनसुद्धा एकही विकेट मिळवता आली नाही, तर कृष्णाने श्रेयस अय्यरला शून्यावर बाद करत पहिली विकेट घेतली आहे.
रोहित-विराटचा खेळ न चालल्याने भारतीय संघ अडचणीत आला होता. त्याचक्षणी यष्टीरक्षक-फलंदाज केएस भरतने उत्तम फलंदाजी केली आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला असता तो ७० धावा आणि मोहम्मद शमी १८ धावा करत खेळपट्टीवर टिकून आहेत. भारताने ६०.२ षटकात ८ विकेट्स गमावत २४६ धावा केल्या आहेत.
या सामन्यात रोमन वॉकरने केलेल्या कामगिरीने इंग्लंडच्या संघनिवड अधिकाऱ्यांना नक्कीच विचार करायला लावला आहे. हा सराव सामना संपल्यावर भारत १ जुलैला इंग्लड विरुद्ध एजबस्टन ग्राउंड, बर्मिंघम येथे कसोटी सामना खेळणार आहेत.
सराव सामन्यासाठी असे आहेत संघ-
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, केएस भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि उमेश यादव
लिसेस्टरशायर सीसीसी: सॅम इवांस (कर्णधार), रेहान अहमद, सॅम बेट्स (यष्टीरक्षक), नेट बॉली, विल डेविस, जॉय एविसन, लुइस किम्बर, अबी सकांडे, रोमन वॉकर, चेतेश्वर पुजारा, रिषभ पंत, जसप्रीत बुमराह आणि प्रसिद्ध कृष्णा.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पांड्याची सेना आयर्लंडमध्ये दाखल, इथेही फडकावणार विजयी पताका?
ENGvsIND: टीम इंडियासाठी गुड न्यूज, फलंदाजांना चारी मुंड्या चीत करणारा पठ्ठ्या मोठ्या संकटातून मुक्त
चाहत्याच्या अचाट स्मरणशक्तीवर सचिनही प्रभावित, प्रत्येक कसोटी शतकाची डिटेल तोंडपाठ- Video