मुंबई । 9 जून हा दिवस वर्ल्ड ओशियन डे म्हणजेच जागतिक समुद्र दिवस म्हणून साजरा केला जातो. याबद्दल सोमवारी भारतीय वनडे संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा याने ट्विटरद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत . रोहित शर्माने त्याचा समुद्र किनारी बसलेला एक सुंदर फोटो सह ट्विटमध्ये लिहिले की, “जागतिक समुद्र दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! चला समुद्र आणि त्या पाण्यातील जिवांना निरोगी ठेवूया.”
Happy world ocean day. Let’s keep our ocean and life under water nice and healthy 🌊 💦 🐠 pic.twitter.com/hho8RvWJb4
— Rohit Sharma (@ImRo45) June 8, 2020
रोहित शर्मा म्हणजे फलंदाजीची नजाकत. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात त्याने धडाकेबाज कामगिरी केली आहे. सध्या तो तुफान फॉर्मात आहे. नुकतेच रोहित शर्माने 2019 साली झालेल्या विश्वचषकात दमदार कामगिरी केल्याने बीसीसीआयने त्याची राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस केली होती. देशातील क्रीडा क्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार आहे. आपल्या नावाची शिफारस केल्याबद्दल त्याने बीसीसीआयचे आभार मानले आहे.
बीसीसीआयने ट्विटरवर अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये रोहित म्हणाला की, “बीसीसीआयने राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी माझ्या नावाची शिफारस केल्याने मला खूप चांगले वाटत आहे. हा भारतातील क्रीडा क्षेत्रातला सर्वात मोठा सन्मान आहे. मी बीसीसीआय, माझे सहकारी, सपोर्ट स्टाफ, क्रिकेट फॅन्स तसेच माझ्या परिवाराचे मी आभार मानतो.”
रोहित शर्माने 32 कसोटी सामन्यात 6 शतके, 1 द्विशतक आणि 10 अर्धशतकासह 2020 हजार 141 धावा केल्या आहेत. तर 224 वनडे सामन्यात 9 हजार 115 धावा केल्या आहेत. यात 29 शतके, 3 द्विशतके, आणि 43 अर्धशतके ठोकली. तर 108 टीट्वेंटी सामन्यात 2 हजार 773धावांची नोंद त्याच्या नावावर आहे. आयपीएलच्या 188 सामन्यात 1 शतक, 36 अर्धशतके ठोकून 4 हजार 898 धावा केल्या.