फॉर्मुला वन रेसिंग म्हटले तर आपणाला लगेच एक नाव आठवते ते म्हणजे मायकल शुमाकर. मायकल शुमाकर यांनी व्यावसायिक रेसिंगमधून निवृत्ती घेतली आहे. मायकल शुमाकर यांच्या एका विक्रमाची बरोबरी सध्याचा मर्सेडिजचा स्टार ड्राइवर लुईस हॅमिल्टनने केली आहे.
समर ब्रेकनंतर काल बेल्जियम ग्रँड प्रिक्सचे आयोजन करण्यात आले होते. या रेससाठी लुईस हॅमिल्टनला पोल पोजिशन देण्यात आली होती.त्याच्या कारकिर्दीतील ही ६८वी पोल पोजीशन आहे. आपल्या पूर्ण कारकिर्दीत शूमाकर यांना ६८ वेळा पोल पोजीशन देण्यात अली होती. या विक्रमात हॅमिल्टनने शुमाकरची बरोबरी केली.
ही हॅमिल्टनच्या कारकिर्दीतील २०० वी रेस होती. ही रेस जिंकत हॅमिल्टनने २००वी रेस जिंकण्याचा अनोख्या विक्रमात मायकल शूमाकर यांनी बरोबरी केली. मायकल शूमाकर यांनी देखील यांची २००वी रेस जिंकली होती.
यावर्षी वर्ल्ड चॅम्पीयन होण्याच्या मुख्य दावेदार असणारा सॅबेस्टियन वेटल दुसऱ्या क्रमांकावर राहिला. यंदाच्या मोसमात वेटल २२० गुणांसह आघाडीवर आहे तर हॅमिल्टनचे २१३ गुण आहेत.
२००वी रेस जिंकण्याचा विक्रम करणारे खेळाडू –
१ मायकल शूमाकर (२००४ साली)
२ जेन्सन बुटोन (२०११)
३ निको रॉसबेर्ग (२०१६)
४ लुईस हॅमिल्टन (२०१७)