मुंबई। इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामात रविवारी (२२ मे) अखेरचा साखळी सामना खेळला गेला. हा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्स संघात झाला. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात पंजाब किंग्सने २९ चेंडू आणि ५ विकेट्स राखून विजय मिळवला. तथापि, सामन्यादरम्यान एक मोठा विक्रम देखील झाला.
या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने २० षटकात ८ बाद १५७ धावा करून पंजाबसमोर १५८ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबच्या फलंदाजांनी आक्रमक खेळ केला. यातही लियाम लिव्हिंगस्टोनने (Liam Livingstone) २२ चेंडूत तुफानी ४९ धावांची खेळी केली.
या खेळी दरम्यान त्याने १५ व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर रोमारिओ शेफर्ड विरुद्ध एक जोरदार षटकार मारला. हा आयपीएल २०२२ (IPL 2022) हंगामातील १००० वा षटकार (1000th Six) ठरला. त्याने याच षटकाच्या अखेरच्या चेंडूवरही षटकार ठोकला. त्यामुळे पंजाबने १६.१ षटकातच १५८ धावांचे आव्हान पूर्ण करत सामना जिंकला.
दरम्यान, आयपीएल इतिहासात असे पहिल्यांदाच घडले की, एका हंगामात १००० पेक्षाही अधिक षटकार मारले गेले. यापूर्वी २०१८ साली ८७२ षटकार मारण्यात आले आहेत. विशेष म्हणजे आयपीएल २०२२ मध्ये अद्याप प्लेऑफची फेरी बाकी आहे. त्यामुळे यावर्षीच्या षटकारांची संख्या अजून वाढू शकते (Most Sixes in an IPL Season).
1000th IPL 2022 SIX – Liam Livingstone's massive 97m maximum!
WATCH https://t.co/QSUhOW55JD #TATAIPL
— IndianPremierLeague (@IPL) May 22, 2022
आयपीएलच्या या १५ व्या हंगामात गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स हे दोन संघ नव्याने सामील झाले आहेत. त्यामुळे यंदा १० संघ खेळत असल्याने सामन्यांची संख्याही ६० वरून ७४ अशी वाढली आहे. याआधी जवळपास २०१४ पासून २०२१ पर्यंत प्रत्येक हंगामात ८ संघ खेळत असल्याने साधारण ६० सामनेच झाले होते. त्यामुळे आयपीएलच्या १५ व्या हंगामात मागील हंगामापेक्षा षटकारांची संख्या वाढणे जवळपास साहजिकच होते.
सर्वाधिक षटकार नोंदवले गेलेले आयपीएल हंगाम
१००१ षटकार – आयपीएल २०२२
८७२ षटकार – आयपीएल २०१८
७८४ षटकार – आयपीएल २०१९
७३४ षटकार – आयपीएल २०२०
७३१ षटकार – आयपीएल २०१२
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
‘आपना टाईम आयेगा’, अर्जुन तेंडुलकरसाठी बहीण साराची भावूक पोस्ट व्हायरल
गोष्ट त्या क्रिकेटरची, ज्याची प्रतिभा अक्षरक्ष: बाळासाहेब ठाकरेंना मैदानावर येण्यास भाग पाडायची
विजयाचा जल्लोष! १६ षटकातच हैदराबादचे आव्हान पूर्ण केल्याने पंजाबच्या खेळाडूंचे जोरदार सेलिब्रेशन