आयपीएल २०२२चा ६४वा साखळी फेरी सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात झाला. मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्ली संघाला फलंदाजीत विशेष कामगिरी करता आली नाही. एकट्या मिचेल मार्शला वगळता दिल्लीकडून इतर फलंदाजांना मोठ्या धावा करता आल्या नाहीत. त्यातही दिल्लीचा धाकड सलामीवीर डेविड वॉर्नर हा तर पहिल्याच चेंडूवर बाद झाला. पंजाबच्या लियाम लिविंगस्टोन याने त्याची विकेट काढली. या विक्रमी कामगिरीनंतर लिविंगस्टोन एका खास यादीत सहभागी झाला आहे.
नाणेफेक जिंकून पंजाबने (PBKS vs DC) प्रथम गोलंदाजी निवडली होती. दिल्लीकडून डेविड वॉर्नर (David Warner) आणि सरफराज खानची जोडी फलंदाजीसाठी आली होती. लिविंगस्टोनच्या (Liam Livingstone) षटकातील पहिलाच चेंडू हवेत टोलवण्याच्या प्रयत्नात राहुल चाहरच्या हातून झेलबाद झाला. अशाप्रकारे लिविंगस्टोनने सामन्याच्या पहिल्या चेंडूवर विकेट काढण्याची करामत केली. तो आयपीएल सामन्यातील पहिल्या चेंडूवर विकेट (Wicket On First Ball Of IPL Match) काढणारा चौथा फिरकीपटू ठरला आहे.
लिविंगस्टोनपूर्वी केविन पीटरसन, मार्लन सॅम्युअल्स आणि जगदीश सुचिथ यांनी हा पराक्रम केला होता.
आयपीएल सामन्याच्या पहिल्या चेंडूवर विकेट घेणारे फिरकीपटू:
केविन पीटरसन (डर्बन २००९)
मार्लन सॅम्युअल्स (कटक २०१२)
जगदीश सुचिथ (मुंबई २०२२)
लियाम लिविंगस्टोन (मुंबई २०२२)
Liam Livingstone strikes and David Warner departs for a duck.
Live – https://t.co/jcOuGiPBtR #PBKSvDC #TATAIPL pic.twitter.com/JnKRelMjJS
— IndianPremierLeague (@IPL) May 16, 2022
दुसरीकडे वॉर्नरने आयपीएलमध्ये पहिल्या चेंडूवर विकेट गमावण्याची (गोल्डन डक) ही तिसरी वेळ होती. पंजाबविरुद्धच्या या सामन्यापूर्वी तो २०१३ मध्ये पंजाब विरोधातील सामन्यातच गोल्डन डक (David Warner Golden Duck) झाला होता. धरमसाला येथे झालेल्या सामन्यात त्याने पहिल्या चेंडूवर आपली विकेट गमावली होती. तसेच २००९ मध्ये सेंच्यूरियन येथे डेक्कन चार्जर्सविरुद्ध त्याने पहिला गोल्डन डक नोंदवला होता.
दरम्यान दिल्लीच्या डावाबद्दल बोलायचे झाल्यास, या महत्त्वपूर्ण सामन्यात दिल्लीकडून मिचेल मार्श याने सर्वाधिक धावा फटकावल्या. ४८ चेंडू खेळताना ३ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने त्याने ६३ धावा केल्या. त्याच्याशिवाय इतर एकाही फलंदाजाला विशेष खेळी करता आली नाही. सलामीवीर सरफराज खान ३२ धावा जोडू शकला. तसेच ललित यादवने २४ धावांचे योगदान दिले. दिल्लीचा संघ निर्धारित २० षटकात ७ विकेट्सच्या नुकसानावर १५९ धावा करू शकला.
महत्त्वाच्या बातम्या-
रियान परागला भोवला अतिशहाणपणा! ट्रोल करत चाहत्यांनी आयपीएलमधून हाकालण्याची केली मागणी
दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर झालेल्या सूर्यकुमारच्या जागी ‘या’ पठ्ठ्याची लॉटरी, बनला मुंबईकर
आयपीएलचा स्पीडस्टार उमरान मलिकला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध संधी मिळणे निश्चित! ‘हे’ २ युवाही ओळीत