आगामी इंडियन प्रीमियर लीगची (Indian Premier League) चाहत्यांना नक्कीच आतुरता लागली आहे. तत्पूर्वी मेगा लिलाव (Mega Auction) होणार आहे. बीसीसीआयने (BCCI) जाहीर केलेल्या नवीन रिटेन्शन नियमांनुसार सर्व संघांनी बुधवारी (31 ऑक्टोबर) रिटेन्शन यादी जाहीर केली. दरम्यान पंजाब किंग्जने (Punjab Kings) फक्त 2 अनकॅप्ड खेळाडूंना रिटेन केले. पंजाबकडे आता मेगा लिलावासाठी सर्वाधिक रक्कम बाकी आहे. पंजाबने विस्फोटक फलंदाज लियाम लिव्हिंगस्टोनला मेगा लिलावापूर्वी रिलीज केले. आता त्याने इंग्लंडसाठी खेळताना तुफानी शतक ठोकले आहे.
आज (2 नोव्हेंबर) रोजी सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर वेस्ट इंडिज विरूद्ध इंग्लंड (West Indies vs England) संघात दुसरा एकदिवसीय सामना खेळला जात होता. ज्यामध्ये इंग्लंडचा कर्णधार लियाम लिव्हिंगस्टोनने (Liam Livingstone) एकदिवसीय कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. लिव्हिंगस्टोनने 85 चेंडूत 145.88च्या स्ट्राईक रेटने 124 धावा केल्या, ज्यामध्ये 5 चौकार आणि 9 गगनचुंबी षटकारांचा समावेश होता. विशेष म्हणजे या विस्फोटक फलंदाजाने 60 चेंडूत अर्धशतक पूर्ण केल्यानंतर, अवघ्या 17 चेंडूत आपले शतक पूर्ण केले.
लियाम लिव्हिंगस्टोनने (Liam Livingstone) 2019 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून आतापर्यंत त्याने 39 सामने खेळले. त्यामध्ये त्याने 162.46च्या स्ट्राईक रेटने 939 धावा केल्या. ज्यामध्ये 6 अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय त्याने 39 सामन्यात 9.14च्या इकॉनॉमीसह 11 विकेट्स घेतल्या आहेत. लिव्हिंगस्टोन 2019 ते 2021 पर्यंत राजस्थान रॉयल्स (RR) संघाकडून खेळला. यानंतर तो 2022 ते 2024 पर्यंत पंजाब किंग्ज (PBKS) संघाचा भाग होता. आता तो मेगा लिलावात दिसणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs NZ; भारतीय संघ अडचणीत असताना रिषभ पंतचे शानदार अर्धशतक!
बाॅर्डर-गावसकर ट्राॅफीमध्ये सलामीला येणार ‘हे’ स्टार खेळाडू! दिग्गजाचे मोठे वक्तव्य
भारतीय संघ फलंदाजी करणं विसरला, घरच्या मैदानावर क्लीन स्वीपची नामुष्की!