रविवारी (दि. १७ एप्रिल) आयपीएल २०२२चा पहिला डबल हेडर सामना पंजाब किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात पार पडला. डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी स्टेडिअमवर पार पडलेल्या आयपीएलच्या २८व्या सामन्यात हैदराबाद संघाने ७ विकेट्सने विजय मिळवला. हा त्यांचा या हंगामातील सलग चौथा विजय होता. हैदराबादच्या विजयाचा शिल्पकार उमरान मलिक ठरला. काहीशा एकतर्फी झालेल्या या सामन्यात पंजाबसाठी लियाम लिव्हिंगस्टोनने शानदार अर्धशतकी खेळी केली. मात्र, त्याच वेळी तो पंचांशी वाद देखील घालताना दिसून आला.
लियाम लिव्हिंगस्टोनचा पंचांशी वाद
प्रमुख खेळाडू एका बाजूने बाद होत असताना लियाम लिव्हिंगस्टोनने दुसऱ्या बाजूने सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांचा यशस्वी सामना केला. त्याने आपले अर्धशतक साजरे केले. मात्र, पंजाबच्या डावात बाराव्या षटकात एक अशी घटना घडली ज्यामुळे लिव्हिंगस्टोन चिडलेला दिसला. त्या षटकातील चौथा चेंडू उमरान मलिक याने जवळपास १४९ च्या वेगाने टाकला. लिव्हिंगस्टोनने या चेंडूवर पूल मारण्याचा प्रयत्न केला पण तो अपयशी ठरला. त्याला वाटले पंच हा चेंडू वाईड देतील. परंतु पंचांनी तो चेंडू वैध ठरवला. त्याने याबाबत पंचांकडे विचारणा केली. पंचांनी फक्त वन बाउन्स असा इशारा केला.
https://twitter.com/cric_big_fan/status/1515649922116116483?t=4G5AK8KA0rwbIax4VRy8-g&s=19
त्यानंतर काहीसा रागावलेल्या लिव्हिंगस्टोनने पुढच्या चेंडूवर समोरच्या दिशेने खणखणीत चौकार मारला. तो फटका इतका वेगवान होता की, नॉन स्ट्रायकर शाहरुख खान स्वतःला वाचवण्याच्या प्रयत्नात खाली पडला. लिव्हिंगस्टोनने या सामन्यात ३३ चेंडू खेळून आक्रमक ६० धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने पाच चौकार व चार षटकारांचा पाऊस पाडला.
https://twitter.com/cric_big_fan/status/1515650881718345728?t=ZW4-OtNZ3XXiBam7WajPJg&s=19
हैदराबादचा शानदार विजय
या सामन्यात हैदराबाद संघाने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत पंजाब संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. यावेळी मयंक अगरवालच्या अनुपस्थितीत प्रभारी कर्णधार बनलेल्या शिखर धवनच्या पंजाब संघाने निर्धारित २० षटकात सर्वबाद १५१ धावा केल्या आणि हैदराबादला १५२ धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान हैदराबादने १८.५ षटकात ३ विकेट्स गमावत पूर्ण केले आणि विजय मिळवला.
महत्वाच्या बातम्या-
मानहानीकारक पराभवानंतर जडेजा झाला व्यक्त; म्हणाला, त्या कारणामुळे आम्ही हरलो
तोडफोड गोलंदाजी! लॉकी फर्ग्युसनने टाकला खतरनाक यॉर्कर, तुटली अंबाती रायुडूची बॅट