मुंबई । कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे यंदाच्या आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. दरवर्षी होणारी आयपीएलची स्पर्धा अनेक खेळाडूंचे आयुष्य बदलून टाकते. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात आयपील २०२०च्या लिलावात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स याला सर्वाधिक रक्कम देऊन कोलकाता नाईट रायडर्स संघाने आपल्या संघात दाखल करून घेतले.
यंदाच्या आयपीएलमधला कमिन्स सर्वात महागडा खेळाडू ठरला. इतकी मोठी रक्कम त्याला मिळाली असली तरी कमिन्सच्या आयुष्यामध्ये त्याचा कोणताच प्रभाव पडला नाही. सहा महिन्यानंतरही त्याच्या आयुष्यात कोणताच बदल घडला नसल्याचे त्याने सांगितले.
कमिन्स कसोटी क्रिकेटमधला जगातला क्रमांक एकचा गोलंदाज असून कोलकाता नाईट रायडर्स संघाने त्याला १५ कोटी ५० लाख रुपये देऊन खरेदी केले. आयपीएलच्या इतिहासातला सर्वात महागडा विदेशी खेळाडू बनला आहे.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार तो म्हणाला, “माझ्या जीवनात कोणताच फरक पडला नाही मी प्रत्येक सामन्यात सर्वश्रेष्ठ कामगिरी करण्याचा प्रयत्न करत असतो. कोणतेही यश अथवा अपयश आले तर माझ्या जीवनावर कोणताही परिणाम घडून येत नाही.”
टी२० क्रिकेटच्या उदयानंतर अनेक खेळाडू कसोटी क्रिकेट खेळण्यास उत्सुक नसल्याचे अनेकदा समोर आले. मात्र पॅट कमिन्सला आजही कसोटी क्रिकेटवर जास्त प्रेम आहे. तो म्हणतो, “कसोटी क्रिकेट प्रकार आव्हानात्मक आहे. या कसोटी क्रिकेटमध्ये कौशल्य, क्षमता आणि मानसिक मजबुतीची परीक्षा असते. कसोटीत विजय मिळविल्यानंतर विलक्षण आनंद मिळतो.”
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्यांच्या खेळाडूंना आऊटडोअर ट्रेनिंग करण्यासाठी परवानगी दिली आहे ऍटकिन्सन नेटवर अभ्यास सुरू केला आहे. मात्र मॅच फिटनेस प्राप्त करण्यासाठी अजून वेळ लागणार आहे.
ऑस्ट्रेलियाच्या या वेगवान गोलंदाजाने २१.८२ च्या सरासरीने ३० कसोटीत १४३ बळी टिपले.
ट्रेंडिंग घडामोडी –
“पाकिस्तानने भारताला इतके वेळा हरवले की त्यांना माफी मागण्याची झाली सवय”
बापरे! ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ खेळाडूने रवी शास्त्रींना दिली होती डोकं फोडण्याची धमकी
टीम इंडियाच्या विजयाचा रथ ‘हा’ संघ रोखणार, माजी खेळाडूचा दावा