---Advertisement---

या ४ भारतीय दिग्गज क्रिकेटपटूंची मुलं, ज्यांना मिळवता आले नाही वडिलांसारखे यश

On: सोमवार, जुलै 6, 2020 7:52 PM
---Advertisement---

कुटुंबात मुलाची वडिलांच्या पावलांवर चालत जाण्याची प्रथा वर्षानुवर्षे चालू आहे. मुलगा बऱ्याचदा आपल्या वडिलांसारखे होण्यासाठी प्रयत्न करतो. क्रिकेटच्या खेळातही अशी बरीच मुले आहेत, ज्यांनी आपल्या वडिलांप्रमाणेच क्रिकेट आपली कारकीर्द म्हणून निवडले आणि त्यात यशस्वीही झाले. क्रिकेट विश्वात आतापर्यंत अशा अनेक वडील- मुलाच्या जोड्या झाल्या आहेत.

क्रिकेटच्या खेळात असे दिसून आले आहे, की वडिलाना स्वत: ला वाटते की आपलाही मुलगा आपल्यासारखा मोठा क्रिकेटपटू व्हावा. आत्तापर्यंत, क्रिकेट विश्वात वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवून आपली कारकीर्द घडविणारी अशी अनेक मुले भारतातही झाली आहेत.

परंतु भारतीय क्रिकेट संघात वडील- मुलाच्या जोड्यांमध्ये अशी अनेक मुले आहेत. ज्यांचे वडील भारतासाठी एक महान खेळाडू बनले. परंतु वडिलांनी जे केले ते मुलाला साध्य करता आले नाही.

भारतातील अशा ४ क्रिकेटपटूंची मुले ज्यांना त्यांच्या वडिलांसारखे यश मिळवता आले नाही-

४. कृष्णमचारी श्रीकांत आणि अनिरुद्ध श्रीकांत (Krishnamachari Srikanth & Anirudh Srikanth)

भारतीय क्रिकेट संघाचे माजी दिग्गज सलामीवीर कृष्णमचारी श्रीकांत त्यांच्या काळातील एक महान फलंदाज होते. श्रीकांत यांना भारतीय क्रिकेट संघातील सर्वात जबरदस्त सलामीवीर म्हणून ओळखले जाते. १९८३ च्या विश्वविजेत्या संघाचा भाग असलेल्या श्रीकांतच्या यशासाठी कुठलीही मान्यता घेण्याची गरज नाही. परंतु त्यांचा मुलगा अनिरुद्ध श्रीकांतला मोठे नाव मिळवता आले नाही. अनिरुद्ध देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये खेळला, पण त्याला तसा दम दाखवता आला नाही, जो त्याच्या वडिलांनी दाखविलेला होता.

३. विजय मांजरेकर आणि संजय मांजरेकर (Vijay Manjrekar & Sanjay Manjrakar)

भारताचे माजी फलंदाज विजय मांजरेकर हे भारतीय कसोटी क्रिकेट इतिहासातील महत्त्वाचे फलंदाज आहेत. भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये विजय यांनी मोठे योगदान दिले आहे. विजय यांनी आपल्या कसोटी कारकीर्दीत ५५ सामन्यांत ३२०८ धावा केल्या. त्यांना त्या काळातील सर्वश्रेष्ठ फलंदाज मानले जात होते.

विजय मांजरेकर यांचा मुलगा संजय मांजरेकर यांनीही भारतीय संघात स्थान मिळवले होते. संजय यांनी भारताकडून ३७ कसोटी आणि ७४ वनडे सामने खेळले. परंतु त्यांचे आकडे त्यांचे वडील विजय मांजरेकर यांच्यासारखे राहिले नाहीत.

२. सुनील गावसकर आणि रोहन गावसकर (Sunil Gavaskar & Rohan Gavaskar)

लिटल मास्टर सुनील गावसकर हा भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात महान फलंदाजांपैकी एक मानले जातात. गावसकर यांनी भारतासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. भारतीय कसोटी क्रिकेटमधील प्रथम दहा हजार धावांचा टप्पा गाठणार्‍या गावसकर यांनी आपल्या कारकीर्दीत ३४ शतके ठोकली आहेत.

जागतिक क्रिकेटमध्ये सुनील गावसकर एक मोठे नाव होते. त्याचबरोबर त्यांचा मुलगा रोहन गावसकर देखील भारताकडून खेळण्यात यशस्वी झाला. परंतु रोहन गावसकरची कारकीर्द फारशी चांगली राहिली नाही. तो भारताकडून काही सामने खेळू शकला आणि नंतर त्याला खेळात सातत्य राखता आले नाही. त्यामुळे त्याला परत कधीही संघात स्थान मिळाले नाही.

१. रॉजर बिन्नी आणि स्टुअर्ट बिन्नी (Rojer Binny & Stuart Binny)

कपिल देव यांच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघाने १९८३ मध्ये विश्वचषक जिंकला होता. कपिल देव यांच्या या संघात भारताचा स्ट्राईक गोलंदाज रॉजर बिन्नी होते. त्या विश्वचषकमध्ये रॉजर यांनी भारतासाठी चांगली कामगिरी बजावली. त्याचबरोबर रॉजर यांनी त्यांच्या कारकिर्दीत उत्तम प्रदर्शन केले आहे.

रॉजर बिन्नी एक प्रतिभावान खेळाडू होते. परंतु त्याचा मुलगा स्टुअर्ट बिन्नी फारसा यशस्वी होऊ शकला नाही. स्टुअर्ट भारताकडून तिन्ही स्वरूपात खेळण्यात यशस्वी झाला. परंतू त्याला खेळात सातत्य राखता आले नाही. आणि त्यामुळे लवकरच तो संघातून बाहेर गेला. त्याने भारताकडून ६ कसोटी, १४ वनडे आणि ३ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत.

वाचनीय लेख-

-असे ५ भारतीय फलंदाज; जे कसोटीच्या चौथ्या डावात ठरले किंग, विराट आहे या क्रमांकावर

-जर भारत-पाकिस्तानचे विभाजन झाले नसते तर हे ५ क्रिकेटर असते टीम इंडियात

-आयपीएलमध्ये ज्या संघाकडून खेळले, त्याच संघाचे कोच झालेले ५ दिग्गज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---