नशीब… असे म्हटले जाते की, कुणाचे नशीब कधी बदलेल हे सांगता येत नाही. याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे भारतीय क्रिकेट संघाचे आणि आयपीएलमधील गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स संघाकडून खेळणारे ‘पंड्या ब्रदर्स’.
हार्दिक पंड्या आणि कृणाल पंड्या हे खूप हलाखीच्या परिस्थितीत लहानाचे मोठे झाले आहेत. त्यांच्याकडे दोन वेळंच अन्न मिळण्याइतकेही पैसे राहत नसायचे. त्यामुळे ५ रुपयांना मिळणारी मॅगी खाऊन ते आपली भूक भागवत असायचे.
इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राला २०१६ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत हार्दिकने सांगितले होते की, ”५ रुपयांची मॅगी येत असे आणि तीच आम्ही भाऊ मैदानावर बनवून खायचो. नाश्ता, जेवण सगळं तेच असे. हा दिनक्रम अगदी ३६५ दिवस चाले. आम्ही भाऊ दिवसभर मैदानात पडून रहायचो. बाहेर चिक्कार उधारी झाली होती. जेवढं मिळायचं ते लगेच संपून जायचं. १० रुपये सोडा ५ रुपयांचे पण वांदे होते. मी मोठ्या प्रमाणावर कर्जात बुडून गेलो होतो. मी जेवढे कमावायचो सगळे उधारी मिटवण्यात जायचे. “
पण याच खेळाडूंसाठी आता पैसा हा हाताच्या मळाप्रमाणे आहे. हार्दिकविषयी बोलायचं झालं तर, तो आता १.०१ कोटी रुपयांचे हीरे जडलेले रोलेक्स घड्याळ घालून फिरत असतो. त्याच्याकडे महागडे कपडे, घर, गाड्या अशा सर्व गोष्टी उपलब्ध आहेत. याच खेळाडूचा आज (११ ऑक्टोबर) २९वा वाढदिवस आहे.
On the field, off the field, in good times and definitely in the bad times, always by your side little bro 🤗 Happy birthday bhai 😘 Love you ❤️ @hardikpandya7 pic.twitter.com/Ri8CDGjK01
— Krunal Pandya (@krunalpandya24) October 10, 2020
त्यानिमित्ताने चाहत्यांपासून ते क्रिकेटपटूंपर्यंत सर्व त्याला शुभेच्छा देत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
वाढदिवस विशेष.! क्रिकेटवर मनापासून प्रेम करणारा दर्दी ‘महानायक’
…आणि हार्दिक पंड्याने सचिनची भविष्यवाणी खरी करुन दाखवली