आयपीएलचा पहिला सिझन सुरु झालेला… टी२० क्रिकेटची अशी धामधूम जग पहिल्यांदाच पाहत होत… अगदी सहा महिन्यापूर्वी टीम इंडिया टी२० वर्ल्डकप जिंकलेली… त्या टीमचा कॅप्टन एमएस धोनी चेन्नई सुपर किंग्सचा कॅप्टन होता… टीम पण तगडी बांधलेली… सीएसकेच कॅम्पेन सुरू झालं अन त्यांनी तुफान फॉर्म पकडला… पहिल्या पाचही मॅच जिंकल्या… माईक हसी, मखाया एन्टिनी, सुरेश रैना यांच्या जोडीने आणखी एक नाव गाजू लागलं एमएस गोनी… ऐकण्यात गल्लत करू नका… एमएस गोनी… म्हणजेच मनप्रीत सिंग गोनी…
६ फूट ४ इंचाची फास्ट बॉलर सारखीच उंची… देसी घी खाऊन बनवलेले मसल अन् बॉडी… एकदम अस्सल पंजाबी पुत्तर… बॉलिंगला स्पीडही १४० च्या आसपास… तर गरज पडल्यास बॅटिंग करून मॅच फिरवायचीही क्षमता…. टी२० च कम्प्लीट पॅकेज असा हा एमएस गोनी…
मंडळी त्याची स्टोरी सांगणारा हा भन्नाट व्हिडीओ नक्की पाहा. तसेच महा स्पोर्ट्सच्या युट्यूबला सबस्क्राईब करायला विसरु नका.