---Advertisement---

कारकिर्दीच्या शिखरावर असताना मलाही मिताली राज प्रमाणे संघातून वगळले- गांगुली

On: सोमवार, नोव्हेंबर 26, 2018 6:15 PM
---Advertisement---

महिला टी20 विश्वचषकात शुक्रवारी( 23 नोव्हेंबर) भारतीय महिला संघ विरुद्ध इंग्लंड महिला संघ यांच्यात पार पडलेल्या उपांत्य सामन्यासाठी भारताची अनुभवी फलंदाज मिताली राजला वगळण्यात आले होते.

यामुळे भारतीय टी20 संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरला प्रचंड टीकेला सामोरे जावे लागले होते. पण भारतीय पुरुष संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला मितालीला वगण्याचे आश्चर्य वाटले नाही. कारण तो म्हणाला तोही या अनुभवातून गेला आहे.

मितालीने या टी20 विश्वचषकात साखळी फेरीत पाकिस्तान आणि आयर्लंड विरुद्ध सलग अर्धशतके केली होती. पण त्यानंतर तिला आॅस्ट्रेलिया विरुद्धच्या साखळी फेरीच्या सामन्यातून गुडघ्याच्या दुघापतीमुळे वगळण्यात आले. पण त्यांनतरही तिला इंग्लंड विरुद्धही वगळण्यात आले.

याबद्दल गांगुली म्हणाला,  “मी सुद्धा भारतीय संघाचे नेतृत्व केल्यानंतर डगआउटमध्ये बसलो होतो. जेव्हा मी मितालीला वगळल्याचे पाहिले तेव्हा मी म्हणालो ‘तुझे ग्रुपमध्ये स्वागत आहे’.”

तो पुढे म्हणाला, ‘कर्णधारांनाही वगळले जाऊ शकते. मीही हे फैसलाबादमध्ये केले आहे. मीही जेव्हा वनडे क्रिकेटमध्ये माझी चांगली कामगिरी होत होती त्याचवेळी मी 15 महिने वनडे क्रिकेट खेळलो नव्हतो. असे आयुष्यात होत असते. पण योग्यवेळी दरवाजे खुले होतात.’

पण त्याचबरोबर हा मितालीचा शेवट नाही हे सांगताना गांगुली म्हणाला, ‘तूम्ही नेहमीच लक्षात ठेवले पाहिजे की तूम्ही सर्वोत्तम आहात. कारण तूम्ही काहीतरी केले आहे आणि तूम्हाला पुन्हा संधी मिळते. त्यामुळे मी मितालीला वगळल्यानंतर नाराज झालो नाही.’

‘पण मी निराश झालो कारण भारत उपांत्य सामना हरले. मला वाटले होते की संघ पुढे जाईल. पण असे होत असते. आयुष्यात कोणत्याही गोष्टीची खात्री देता येत नाही.’

गांगुलीला 2005-06 दरम्यान वनडे आणि कसोटी संघातून वगळण्यात आले होते. त्यानंतर त्याने पुन्हा भारतीय संघात पुनरागमन केले होते. तसेच अखेर 2008 मध्ये गांगुलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

महत्त्वाच्या बातम्या:

कोहलीच्या झंझावातापुढे रोहितचा तो कारनामा कुणाच्या लक्षातही आला नाही

सिक्युरीटी गार्डने पकडला कोहलीचा अफलातून षटकार, पहा व्हिडीओ

विराट जगातील १११७ खेळाडूंना ठरला भारी, जाणून घ्या काय आहे कारण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment