क्रिकेटला ‘जेंटलमेंन गेम’ असे म्हटले जाते. परंतु क्रिकेट सामना चालू असताना अनेक खेळाडूंचा रागावरील ताबा सुटल्याचे दिसले आहे. असेच काही दृश्य आपल्याला सध्या ढाका प्रीमियर लीगमध्ये दिसले आहे. ढाका प्रीमियर लीग २०२१ च्या सामन्यात बांगलादेशचा अष्टपैलू शाकिब अल हसनने मैदानावरील सर्व मर्यादा ओलांडल्या आहे. तो भर सामन्यात पंचांशी अतिशय उद्धटपणे बोलला व लाथ मारून स्टंपही पाडले. या घटनेनंतर शाकिबवर ३ सामन्यांची बंदी घालण्यात आली आहे व त्याला ५ लाखांचा दंडही आकारण्यात आला आहे.
क्रिकेटच्या मैदानावर अशा प्रकारच्या घटना घडल्याची पहिली वेळ नाही. यापुर्वीही बऱ्याचदा रागाच्या भरात खेळाडूंनी मैदानावर नकोसे कृत्य केले आहे. या लेखात आपण अशाच खेळाडूंबद्दल जाणून घेऊ, ज्यांनी मैदानावर आपले नियंत्रण गमावले.
महेंद्रसिंग धोनी
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ‘कॅप्टनकूल’ म्हणून ओळखला जातो. पण २०१२ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सीबी मालिकेच्या सामन्यादरम्यान महेंद्रसिंग धोनी मैदानात भडकला होता. माईक हसीला यष्टीचित केल्यानंतर त्याने पंचांकडे अपील केली होती. परंतु तपासून पाहिल्यानंतर रिप्लेमध्ये माईक हसी हा क्रिझमध्ये असल्याचे असे आढळून आले होते. परंतु तिसऱ्या पंचांनी त्याला बाद घोषित केले होते. मात्र तिसऱ्या पंचाच्या चुकीनंतर मैदानी पंच बिली बॉउंडिंगने पव्हेलियनकडे जात असलेल्या माईक हसीला परत बोलावले होते. या गोष्टीवरून धोनी मैदानी पंचांवर भडकला होता व त्याने पंचांशी वाद घातला होता.
रोहित शर्मा आणि प्रवीण कुमार
२०११-२०१२ मध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता. तेव्हा रोहित शर्मा सामन्यापुर्वी सराव करीत होता. त्यावेळी एका चाहत्याने आक्षेपार्ह शब्द वापरले, ज्यामुळे रोहित शर्मा व प्रवीण कुमार संतापले. एकीकडे प्रवीण कुमारने त्या चाहत्याला स्टंप दाखवून जीवे मारण्याची धमकीही दिली आणि रोहित शर्मानेही आपला संयम गमवला होता.
डेविड वॉर्नर
वर्ष २०१८ मध्ये ऑस्ट्रेलिया संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यावर डेविड वॉर्नर आणि दक्षिण आफ्रिका यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकमध्ये वाद झाला होता. कसोटी सामन्याच्या दिवसाचा खेळ संपल्यावर दोन्ही संघ ड्रेसिंग रूममध्ये जात असताना डेविड वॉर्नरने क्विंटन डी कॉकला मारण्याचाही प्रयत्न केला होता
महत्वाच्या बातम्या
व्वा रे ‘किंग कोहली’! WTC फायनलपुर्वी गोलंदाजीत आजमावला हात, अनुभवी फलंदाजालाही टाकले संकटात
अरेरे! सचिन-सेहवागला फिरकीच्या तालावर नाचवणारा गोलंदाज, आता बनलाय ‘टॅक्सी चालक’
वर्ष २००८मध्ये धोनीने दिली होती नेतृत्तवपद सोडण्याची धमकी? सहकाऱ्याने सांगितले होते सत्य