फीफा विश्वचषक 2022 कतार देशात खेळवला गेला. 2022च्या या विश्वचषकात अर्जेंटिना संघाने इतिहास घडवला. अर्जेंटिनाने मोठ्या काळानंतर लिओनल मेस्सी याच्या नेतृत्वाखाली विश्वचषकावर आपले नाव कोरले. हा विश्वचषक जिंकल्याच्या आठवड्याभरानंतर मेस्सीने भारताचा माजी दिग्गज कर्णधार एमएस धोनी याची मुलगी झिवा हीच्यासाठी एक शानदार भेट पाठवली. एक अशी भेट जी मिळवण्यासाठी प्रत्येक फुटबॉल चाहता तरसतो.
भारताचा माजी खेळाडू प्रज्ञान ओझा (Pragyan Ojha) याने काही दिवसांआधी खुलासा केला होता की लिओनल मेस्सी (Linonel Messi) याने बीसीसीआयचे अध्यक्ष जय शाह यांच्यासाठी स्वाक्षरी केलेली जर्सी पाठवली होती. त्यानेे धोनीच्या मुलीसाठी देखील आणखी एक टीशर्ट पाठवल्याची बाब आता समोर येत आहे. झिवाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला आहे, ज्यात तिने मेस्सीने भेट म्हणून पाठवलेला टीशर्ट परिधान केलेला आहे. भारतात लिओनल मेस्सी याचा चाहतावर्ग कोटींच्या घरात आहे. मेस्सीला ओळखत नसेल असा क्वचित एखादा व्यक्ती असेल. धोनी देखील फुटबॉल चाहता आहे. काही वर्षांआधी त्याने मेस्सीबद्दल एक ट्वीट केले होते. धोनी नेहमी सोशल मीडियापासून दूर राहतो. मेस्सीकडून भेट देण्यात आलेल्या टीशर्टबद्दल धोनीकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
कतारमध्ये झालेल्या विश्वचषकात अर्जेंटिना संघाने इतिहास रचला होता. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने फ्रांसवर मात करत रोमहर्षक विजय मिळवला. हा सामना निर्धारित वेळेत 2-2 अशा बरोबरीत सुटला होता. त्यानंतर 30 मिनिटांच्या एक्स्ट्रा टाईममध्ये देखील सामना 3-3ने बरोबर राहिला. त्यामुळे या सामन्याचा निकाल शूटआऊटने काढण्यात आला. शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाने फ्रांसवर 4-2ने मात केली. या सामन्यात लिओनल मेस्सी याने एकूण दोन गोल केले होते. तर फ्रांससाठी किलीयन एम्बाप्पे याने 3 गोल केले होते. हा विश्वचषक जिंकल्यावर मेस्सीवर स्तुतीसुमनांचा पाऊस पडला होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
Video: अर्जुनची धोनीसारखी विकेटकीपिंग पाहिली का? केले दोन भन्नाट रनआउट
मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजासाठी वर्षाचा शेवट आंबट-गोड! आयपीएल लिलावामध्ये कमावले कोटी, आता दुखापतीमुळे…