फुटबॉल जगतातील सर्वात मानाचा पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बॅलोन डी और पुरस्काराची मंगळवारी (31 ऑक्टोबर) घोषणा झाली. अर्जेंटिना संघाचा विश्वविजेता कर्णधार लिओनेल मेस्सी याने 2023 वर्षासाठीचा हा पुरस्कार जिंकला. त्याने विक्रमी आठव्यांदा हा पुरस्कार आपल्या नावे केला. त्याने एर्लिंग हालांड याला मागे सोडले. महिला विभागात हा पुरस्कार स्पेनच्या विश्वविजेत्या बोनमाती हिने जिंकला.
MESSI IS INFINITY! #ballondor pic.twitter.com/EMKaeY6oWI
— Ballon d'Or #ballondor (@ballondor) October 30, 2023
अर्जेंटिनाचा विश्वविजेता कर्णधार असलेल्या मेस्सीला या पुरस्कारासाठी नॉर्व व मॅंचेस्टर सिटीचा हालांड व फ्रान्सचा किलीयन एम्बाप्पे यांनी टक्कर दिली. मात्र, अखेरीस मेस्सी याने बाजी मारली. इंग्लिश फुटबॉल क्लब मँचेस्टर सिटीला वर्षातील सर्वोत्तम व्यावसायिक फुटबॉल क्लब हा पुरस्कार मिळाला. तर, हालांड याला गर्ड मुलर पुरस्कार मिळाला. तर सर्वोत्कृष्ट गोलकीपरचा पुरस्कार अर्जेंटिनाच्या मार्टिनेजला याचीन पुरस्काराने गौरवले गेले.
(Lionel Messi Won Ballon d’Or 2023 It’s Eight Time In Career)
हेही वाचा-
भारताच्या माजी खेळाडूने गायले शाहीन आफ्रिदीचे गुणगान, इतर गोलंदाजांविषयी म्हणाला…
‘असे’ 5 खेळाडू, ज्यांच्याकडून वर्ल्डकपमध्ये कुणालाच नव्हती अपेक्षा, पण आपल्या प्रदर्शनाने करतायेत धमाल