आयपीएल २०२१ चे उर्वरित सामने १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये खेळले जाणार आहेत. त्यासाठी सर्व आयपीएल संघ यूएईमध्ये दाखल झाले आहेत आणि सराव करत आहेत. कोणताही क्रिकेट सामना जास्त रोमांचक बनवण्यासाठी समालोचक महत्वाची भूमिका पार पाडत असतो. आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्याला अवघे काही दिवस असताना स्पर्धेसाठी समालोचकांची नावे समोर आली आहेत.
आगामी आयपीएल स्पर्धेसाठी हिंदी आणि इंग्रजी समालोचकांची यादी जाहीर झाली आहे. हिंदी समालोचन करणाऱ्यांच्या यादीत भारताचा माजी अष्टपैलू इरफान पठान, गौतम गंभीर, पार्थिव पटेल, किरण मोरे, आकाश चोप्रा, निखिल चोप्रा, जतिन सप्रू, सोरेन सुंदरम आणि तान्या पुरोहित यांच्या नावांचा समावेश आहे.
Hi Santosh! Here are the Hindi commentators for #VIVOIPL2021 – Jatin Sapru, Suren Sundaram, Aakash Chopra, Nikhil Chopra, Tanya Purohit, Irfan Pathan, Gautam Gambhir, Parthiv Patel and Kiran More.
— Star Sports (@StarSportsIndia) September 11, 2021
समलोचकांच्या यादीतील इंग्रजी भाषेत समालोचन करणाऱ्यांचा विचार केला तर यांमध्ये अनेक दिग्गजांचा समावेश आहे. या नावांमध्ये हर्षा भोगले, सुनील गावसकर, इयान बिशप, एलन विल्किंस, केविन पीटरसन, डॅनी मॉरिसन, सायमन डॉल, मॅथ्यू हेडन, मपोम्मी मबांगवा, निक नाइट, लक्ष्मण शिवरामकृष्णन, अंजुम चोप्रा, दीप दासगुप्ता, मुरली कार्तिक यांचा सामावेश आहे.
Hi Saurodip! Here you go-Harsha Bhogle, S. Gavaskar, L Siva, Murali Kartik, Deep Dasgupta, Anjum Chopra, Ian Bishop, Alan Wilkins, Mbangwa, Nicholas Knight, Danny Morrison, Simon Doull, Matthew Hayden & Kevin Pietersen.
— Star Sports (@StarSportsIndia) September 11, 2021
एप्रिलमध्ये भारतात आयोजित केलेल्या आयपीएल २०२१ चा हंगाम अर्ध्यात स्थगित करण्यात आला होता. आयपीएल संघांच्या बायो बबलमध्ये कोरोनाने शिरकाव केला असून काही खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमधील सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती. याच पार्श्वभूमीवर स्पर्धा स्थगित करण्यात आली. या चालू हंगामातील २९ सामने खेळले गेले असून ३१ सामने खेळायचे बाकी आहेत. हे सामने आता यूएईमधील दुसऱ्या टप्यात खेळले जातील.
दुसऱ्या टप्प्यातील पहिला सामना १९ सप्टेंबरला मुंबई इंडियन्स विरुद्द चेन्नई सुपर किंग्ज या संघांमध्ये होणार आहे. गुणतालिकेचा विचार केला तर दिल्ली कॅपिटल्स संघ १२ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे तसेच चेन्नई सुपर किंग्ज १० गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
शास्त्री आणि सहकारी ‘या’ दिवशी परतणार मायदेशी! पण त्याआधी कोरोना निगेटिव्ह येणे आवश्यक
तब्बल २४ हजार धावा आणि ४०० गडी बाद करणारा ‘हा’ क्रिकेटर टी२० विश्वचषकानंतर घेणार निवृत्ती
‘या’ ३५ वर्षीय क्रिकेटरची तडकाफडकी निवृत्तीची घोषणा, आज खेळणार शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना