टी२० क्रिकेट म्हणलं की, फलंदाजांची आतषबाजी आणि गोलंदाजांचा भेदक मारा पाहायला मिळणे ठरलेले असते. षटकांची मर्यादा असल्याने फलंदाज तर प्रत्येक चेंडू सीमारेषेबाहेर टोलवण्याचा प्रयत्न करत असतो. नुकताच टी२० लीग, इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा हंगाम संपला आहे. या हंगामातील अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने कोलकाता नाईट रायडर्सला २७ धावांनी पराभूत करत ट्रॉफी जिंकली आहे.
विजेत्या चेन्नई संघाकडून युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाड याने सर्वाधिक धावा फटकावत ऑरेंज कॅप पटकावली आहे. परंतु या हंगामात सर्वाधिक षटकार ठोकण्याचा पराक्रम मात्र पंजाब किंग्जचा कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलने केला आहे.
राहुलने या हंगामात १३ आयपीएल सामने खेळताना १३९ च्या स्ट्राईक रेटने फटकेबाजी करत ६२६ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून ३० षटकार आले आहेत. यासह तो आयपीएल २०२१ मध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज ठरला आहे. आयपीएलच्या १४ हंगामांच्या इतिहासात राहुलने पहिल्यांदाच हा पराक्रम केला आहे.
राहुलपूर्वी रिषभ पंत, रॉबिन उथप्पा, इशान किशन आणि विराट कोहली हे भारतीय क्रिकेटपटूही आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज राहिले आहेत. तर विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जाणारा ख्रिस गेल याने चक्क ४ वेळा हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याने २०११, २०१२, २०१३ आणि २०१५ मध्ये सर्वाधिक षटकार ठोकले होते.
आयपीएलच्या प्रत्येक हंगामातील ‘सिक्सर किंग’
२००८- सनथ जयसूर्या (३१)
२००९- ऍडम गिलख्रिस्ट (२९)
२०१०- रॉबिन उथप्पा (२७)
२०११- ख्रिस गेल (४४)
२०१२- ख्रिस गेल (५९)
२०१३- ख्रिस गेल (५१)
२०१४- ग्लेन मॅक्सवेल (३६)
२०१५- ख्रिस गेल (३८)
२०१६ विरट कोहली (३८)
२०१७- ग्लेन मॅक्सवेल, डेविड वॉर्नर (२६)
२०१८- रिषभ पंत (३७)
२०१९- आंद्रे रसेल (५२)
२०२०- इशान किशन (३०)
२०२१- केएल राहुल- (३०)
महत्त्वाच्या बातम्या-
प्रतिस्पर्धी असूनही ‘त्या’ प्रसंगानंतर धोनीने त्रिपाठीची थोपटली पाठ, कारण ऐकून छाती अभिमानाने फुगेल
आपल्या षटकारांनी प्रेक्षकांना नेहमीच आभाळाकडे पाहायला लावणारे ५ धुरंधर; अव्वलस्थानी ‘हा’ पठ्ठ्या
त्रिपाठीची दुखापत ते चक्रवर्तीचे अपयश; या महत्त्वाच्या ५ कारणांमुळे केकेआरने गमावले आयपीएल विजेतेपद