क्रिकेट खेळामधील मानाच्या समजल्या जाणाऱ्या विस्डेनच्या यादीची घोषणा करण्यात आली आहे. २०२१ वर्षातील विस्डेनची सर्वोत्कृष्ट खेळाडूंची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये इंग्लंड, पाकिस्तान आणि वेस्ट इंडीजमधील खेळाडूंचा तसेच इंग्लंडचा एक वयस्कर खेळाडू अशा पाच खेळाडूंचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे.
याच विस्डेनच्या यादीत समावेश करण्यात आलेल्या खेळाडूंची माहिती आपण पुढे पाहणार आहोत.
डोमिनिक सिब्ली
इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार असणाऱ्या डोमिनिक सिब्ली याने वेस्ट इंडिज संघाच्याविरुद्ध कसोटी मालिकेत चांगली फलंदाजी केली होते. ३ कसोटी सामन्यांमध्ये डोमिनिक सिब्लीने २ अर्धशतक करताना १ शतक पण केले होते. इंग्लंडच्या विजयात त्याने महत्वाची कामगिरी बजावली होती. त्यामुळे विस्डेनच्या सर्वोत्कृष्ट खेळाडूंच्या यादीत त्याचा समावेश करण्यात आला आहे.
जेसन होल्डर
विस्डेन २०२१ च्या यादीमध्ये वेस्ट इंडिज संघाचा खेळाडू जेसन होल्डरचा पण समावेश करण्यात आला आहे. गेल्यावर्षी इंग्लंड संघाच्या विरोधात त्याने ४२ धावा देऊन ६ बळी मिळवले होते. त्या सामन्यात वेस्ट इंडिज संघाने इंग्लंड संघाचा त्यांच्याच भूमीवर पराभव केला होता.
मोहम्मद रिजवान
पाकिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानचा समावेश या यादीत करण्यात आला आहे. त्याने इंग्लंडविरुद्ध केलेल्या फलंदाजी आणि घेतलेल्या बळींमुळे त्याचा समावेश विस्डेनच्या यादीत करण्यात आला आहे. इंग्लंड संघाच्या विरोधात झालेल्या ३ कसोटी सामन्यांमध्ये सामन्यात त्याने सातत्याने ४० च्या सरासरीने धावा केल्या होत्या.
डेरेन स्टीवन्स
डेरेन स्टीवन्स हा २०२१ वर्षात विस्डेनच्या यादीत सामील झालेला सर्वात जास्त वयाचा एकमेव खेळाडू ठरला आहे. तो इंग्लंड संघाकडून काउंटी क्रिकेट खेळतो. त्याने वयाच्या ४४ व्या वर्षी हा विक्रम केला आहे. त्याने बॉब विलीस ट्रॉफीमध्ये २९ बळी मिळवले होते.
झॅक क्राउले
झॅक क्राउले हा इंग्लंड संघांच्या कसोटी संघाचा फलंदाज आहे. पाकिस्तान संघाच्या विरुद्ध खेळताना त्याने ३ सामन्यांच्या कसोटी सामन्यांमध्ये २६७ धावा केल्या होत्या. त्यासाठी त्याला विस्डेन २०२१ च्या यादीत समाविष्ट करण्यात आले.
विस्डेन २०२१ च्या इतर खेळाडूंमध्ये बेन स्टोक्सचा पण समावेश करण्यात आला आहे. त्याने इंग्लंड संघाकडून ५४ च्या सरासरीने ६४१ धावा केल्या आहेत. वेस्ट इंडिजचा खेळाडू कायरन पोलार्डचा पण समावेश करण्यात आला आहे. त्याने टी२० सामन्यांमध्ये सातत्याने धावा करताना सर्वाधिक षटकार पण मारले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
वाह मानलं चाहर तुला! २०१७ पासून बनलाय पॉवर प्लेचा ‘सुपर किंग’; पाहा ही खास आकडेवारी
याला म्हणतात प्रतिभा! दिपक चाहरच्या भेदक गोलंदाजीने जिंकली सर्वांची मने, पाहा व्हिडिओ
जडेजा ऑन फायर!! केएल राहुलला ‘रॉकट थ्रो’ करत केले धावबाद,पहा व्हिडिओ