इंडियन प्रीमियर लीगचा 13 वा हंगाम मंगळवारी (10 नोव्हेंबर) संपन्न झाला. या हंगामात अनेक फलंदाजांनी आपली छाप सोडली. मात्र, असे गोलंदाज आहेत ज्यांनी आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीने भल्याभल्या फलंदाजांना घाम फोडला. यातील अतिशय गांभिर्याने घ्यावी अशी गोष्ट म्हणजे, ज्या संघांच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली, त्यांचे संघ साखळी फेरीत टॉपला राहिले. तसेच त्यांनी स्पर्धेत चांगली कामगिरी केली.
या लेखात आपण अशा गोलंदाजांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी या हंगामात सर्वाधिक निर्धाव चेंडू फेकले आहेत.
• भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने आयपीएल 2020 मध्ये सर्वाधिक निर्धाव चेंडू फेकले आहेत. तो या हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळत होता. त्याने सर्वाधिक 175 निर्धाव चेंडू फेकले आहे.
• राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याने या यादीत जसप्रीत बुमराहची बरोबरी केली आहे. त्यानेही 175 निर्धाव चेंडू फेकले आहे.
• भल्याभल्या फलंदाजांना आपल्या गोलंदाजीवर नाचवणारा फिरकीपटू रशिद खान या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना त्याने 168 निर्धाव चेंडू फेकले आहेत.
• दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज एन्रीच नॉर्किए याने 160 निर्धाव चेंडू फेकत या यादीत चौथे स्थान मिळवले आहे.
• न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट यंदा मुंबई इंडियन्सकडून खेळत होता.त्याने 157 निर्धाव चेंडू फेकत या यादीत पाचवे स्थान मिळवले आहे.
या हंगामात सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत बुमराह कागिसो रबाडानंतर दुसऱ्या स्थानावर होता. त्याने 15 सामन्यात 27 बळी घेतले आहेत