इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी हंगामात सर्व संघांचे कर्णधार निश्चित झाले आहेत. नुकताच हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार बनला. रोहित शर्मा याला कर्णधारपदावरून काढल्यामुळे चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी पाहायला मिळत आहे. मुंबई इंडियन्स नव्या कर्णधाराच्या नेतृत्वा कशी कामगिरी करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
हार्दिक पंड्या (Hardik Pandya) मागच्या दोन आयपीएल हंगामांमध्ये गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार होता. पण आयपीएल 2024 मध्ये मात्र हार्दिक पुन्हा एकदा मुंबईच्या ताफ्यात सामील झाला आणि त्याला संघाचे कर्णधारपद सोपवले गेले. दुसरीकडे रोहित शर्मा (Rohit Sharma) याने मुंबईसाठी मागच्या 10 आयपीएल हंगामांमध्ये कर्णधाराची भूमिका पार पाडली. यातील पाच हंगामात मुंबई संघाने ट्रॉफी देखील जिंकली. असे असले तरी, हार्दिकला अचानक मुंबईच्या कर्णधारपदी नियुक्त केल्यामुळे चाहते नाराज दिसत आहेत. दुसरीकडे गुजरात टायटन्सला शुबमन गिल (Shubman Gill) याच्या रुपात नवा कर्णधार मिळाला आहे.
दुसरीकडे कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघांनाही आगामी हंगामात आपले जुने कर्णधार पुन्हा मिळाले आहेत. मागच्या आयपीएल हंगामात नितीश राणा केकेआरचा कर्णधार होता. यावर्षी श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याने संघात पुनरागमन केल्यामुळे कर्णधारपदाची धुरा पुन्हा एकदा श्रेयसच्या हातात आली आहे. दुसरीकडे नितीश राणा आगामी हंगामात उपकर्णदाराची भूमिका पार पाडताना दिसेल.
दिल्ली कॅपिटल्स आगामी हंगामात रिषभ पंत (Rishabh Pant) याच्या नेतृत्वात खेळणार, अशा चर्चा आहेत. मागच्या आयपीएल हंगामात पंत दुखापतीमुळे खेळू शकला नाही. त्याच्या गाडीचा भीषण अपघात झाला होता, ज्यामध्ये त्याला गंभीर दुखापत झाली. मागच्या एका वर्षापासून पंत दुखापतीमुळे क्रिकेटच्या मैदानातून बाहेर दिसला आहे. पण माध्यमांतील वृत्तांनुसार आगामी आयपीएल हंगामात दिल्ली कॅफिटल्ससाठी पंत इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळू शकतो. मागच्या आयपीएल हंगामात दिल्लीचा कर्णधार असणारा डेव्हिड वॉर्नर (David Warner) आगामी हंगामात मात्र कर्णाधाराच्या भूमिकेत न दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याव्यतिरिक्त लीगमध्ये खेळणाऱ्या इतर सहा संघांचे कर्णधार मात्र बदलले गेले नाहीत. मागच्या हंगामातील चेहरेच आगामी हंगामात आपल्या संघाचे नेतृत्व करताना दिसती. (List of captains of all 10 teams for IPL 2024)
आयपीएल 2024 मध्ये हे 10 खेळाडू करणार आपल्या संघाचे नेतृत्व
मुंबई इंडियन्स – हार्दिक पंड्या
चेन्नई सुपर किंग्ज – एमएस धोनी
कोलकाता नाईट रायडर्स – श्रेयस अय्यर
सनरायझर्स हैदराबाद – ऍडेन मार्करम
पंजाब किंग्ज – शिखर धवन
गुजरात टायटन्स – शुबमन गिल
लखनऊ सुपर जायंट्स – केएल राहुल
दिल्ली कॅपिटल्स – रिषभ पंत
राजस्थान रॉयल्स – संजू सॅमसन
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर – फाफ डू प्लेसिस
महत्वाच्या बातम्या –
भारतीय संघाला मोठा धक्का! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून स्टार खेळाडू बाहेर, ‘या’ खेळाडूची वर्णी
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा सर्वात मोठा विजय, साई सुदर्शनचे पदार्पण सामन्यात अर्धशतक