क्रिकेटचे आणि बॉलिवूडचे पुर्वीपासून एक वेगळेच नाते आहे. बऱ्याच भारतीय क्रिकेटपटूंनी बॉलिवूड अभिनेत्रींसह लग्न केले. तर, काही भारतीय खेळाडूंनी क्रिकेट कारकिर्द संपल्यानंतर चित्रपट क्षेत्रात आपला हात आजमावला. योगराज सिंग यांनी अनेक हिंदी आणि पंजाबी चित्रपटात काम केले आहे. तसेच, त्यांनी काही पंजाबी चित्रपटांचे दिग्दर्शनही केले आहे. भारताचा माजी वेगवान गोलंदाज एस श्रीसंतनेही क्रिकेटवरील बंदीनंतर तमिळ आणि हिंदी चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत.
शिवाय, अनेक क्रिकेटपटूंच्या जीवनावर हिंदी चित्रपटही निघाले आहेत. जसे की, भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या जिवनावरील एमएस धोनी- द अनटोल्ड स्टोरी, मास्टर ब्लास्टरचा सचिन-अ बिलियन ड्रीम. तसेच, काही दिवसांमध्ये भारताचे माजी अष्टपैलू क्रिकेटपटू कपिल देव यांच्या जिवनावर ८६’ हा चित्रपट येणार आहे. तर, इकबाल, चैन कुली की मैन कुली, ढिशूम असे क्रिकेटशी संबंधितही काही चित्रपट आहेत.
पण, या पलीकडेही असे काही चित्रपट आहेत. ज्यामध्ये भारतीय क्रिकेटपटूंनी दुसरी कुणाची भूमिका न निभावता स्वत:चीच भूमिका निभावली आहे. या लेखात, अशा ३ चित्रपटांचा आणि त्या भारतीय क्रिकेटपटूंचा आढावा घेण्यात आला आहे. तर बघूया…
एमएस धोनी- द अनटोल्ड स्टोरी
२०१६मध्ये भारताच्या यशस्वी कर्णधार एमएस धोनीच्या जिवनावर आधारित एक चित्रपट आला होता. त्या चित्रपटाचे नाव ‘एमएस धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ हे होते. या चित्रपटात सुशांत सिंग राजपूतने धोनीची भूमिका साकारली होती. लहानपणापासून ते २०११च्या विश्वचषकापर्यंतचा धोनीचा प्रवास या चित्रपटात दाखवण्यात आला आहे.
दरम्यान भारताचे माजी खेळाडू आणि मुख्य निवडकर्ता असलेले किरण मोरे यांनीही या चित्रपटात काम केले आहे. त्यांनी स्वत:चीच भूमिका निभावली आहे. किरण मोरे भारतीय संघाचे निवडकर्ता असताना एमएस धोनीची संघात निवड झाली होती.
शिवाय चित्रपटाच्या क्लाइमॅक्स सीनमध्ये स्वत: धोनीनेही उपस्थिती लावली होती. दुदैवाची गोष्ट म्हणजे यात धोनीची तगडी भूमिका करणाऱ्या सुशांत सिंग राजपूत या अभिनेत्याने आज (१६ जून २०२०) रोजी आत्महत्या करत जगाचा निरोप घेतला.
मुझसे शादी करोगी
२००४मध्ये बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अक्षय कुमार याचा एक कॉमेडी चित्रपट आला होता. तसं तर या चित्रपटाची कहाणी क्रिकेटशी मिळती जुळती नव्हती. पण, या चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये अक्षय आणि सलमान हे अनेक दिग्गज भारतीय खेळाडूंसोबत दिसून आले.
क्लायमॅक्समध्ये सलमान गोवा सोडून जाणार असतो. परंतु, तो अक्षय कुमारचा पाठलाग करत स्टेडियममध्ये पोहोचतो. तिथे भारत विरुद्ध पाकिस्तान संघात सामना होणार होता. त्या सीनमध्ये नवज्योत सिंग सिद्धू समालोचन करताना दिसत होते. तर, इरफान पठान, जवागल श्रीनाथ, पार्थिव पटेल, मोहम्मद कैफ, हरभजन सिंग आणि आशिष नेहरा मैदानावर सराव करताना दिसत आहेत.
तसेच, कपिल देव मैदानावर भाषण देण्यासाठी आले होते. परंतु, सलमान त्यांच्या हातातून माइक काढून घेतो आणि तो आपले प्रेम व्यक्त करतो. एकसाथ इतक्या भारतीय खेळाडूंचा तो छोटा सीन सर्वांना खूप आवडला.
विक्ट्री
२००९मध्ये पूर्णपणे क्रिकेटवर आधारित विक्ट्री चित्रपट आला होता. यामध्ये हरमन बवेजा याने मुख्य भूमिका साकारली होती. एक मुलगा ज्याला क्रिकेटपटू बनायचे होते आणि त्याने आपले स्वप्न पूर्ण केले आणि तो भारताकडून खेळला, अशी त्या चित्रपटाची कहाणी होती.
या चित्रपटात फक्त भारतीय खेळाडूच नव्हे तर जगभरातील मोठमोठ्या संघातील खेळाडूही दिसून येतात. प्रवीण कुमार, आरपी सिंग, मनिंदर सिंग, पंकज सिंग, हरभजन सिंग, दिनेश कार्तिक, रमेश पवार, सुरेश रैना, रोहित शर्मा, आशिष नेहरा, इशांत शर्मा, यूसुफ पठान हे भारतीय खेळाडू या चित्रपटात दिसून येतात.
ट्रेंडिंग लेख-
भारतासाठी फक्त १ कसोटी सामना खेळू शकलेले ५ खेळाडू; एक आहेत विश्वविजेत्या दिग्गज…
भारतीय संघाकडून वनडेत खेळलेले ४ खेळाडू, जे फारसे कुणाला माहीत नाही
महिला क्रिकेटपटूंनी केलेले ‘ते’ ५ विक्रम, जे पुरुष क्रिकेटपटूंनाही…