---Advertisement---

फक्त ७ खेळाडूंनी केलंय टी२०मध्ये टीम इंडियाचं नेतृत्त्व, चक्क २ मुंबईकरांचा आहे यात समावेश

On: शुक्रवार, सप्टेंबर 17, 2021 1:18 PM
---Advertisement---

आगामी टी२० विश्वचषक २०२१ ते बिगुल वाजल्यापासून सर्वांचे लक्ष या मोठ्या स्पर्धेवर लागले आहे. यादरम्यान भारतीय संघाचा विद्यमान कर्णधार विराट कोहली याने अचानक टी२० विश्वचषकानंतर आपण भारताच्या टी२० संघाच्या नेतृत्त्वाच्या जबाबदारीतून मुक्त होणार असल्याची घोषणा करत सर्वांनाच चकित केले आहे. विराटनंतर मर्यादित षटकांच्या संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा याच्यावर ही जबाबदारी सोपवली जाईल, अशी चर्चा आहे.

भारताच्या टी२० संघाच्या नेतृत्त्वपदाचा विषय निघालाच आहे; तर एकदा भारतीय टी२० क्रिकेटच्या इतिहासात डोकावून पाहूया. आणि जाणून घेऊयात की, आजवर या संघाच्या नेतृत्त्वाची सूत्रे कोणकोणत्या शिलेदारांच्या हाती सोपवली गेली आहेत?

भारतीय संघाने १५ वर्षांपूर्वी अर्थातच वर्ष २००६ मध्ये पहिलावहिला टी२० सामना खेळला होता. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाच्या वेळापत्रकात या एकमात्र टी२० सामन्याचीही नोंद होती. १ डिसेंबर रोजी जोहान्सबर्ग येथे झालेला हा सामना भारताने १ चेंडू शिल्लक असताना ६ विकेट्स राखून जिंकला होता. या सामन्यात भारतीय संघाच्या नेतृत्त्वाची कमान माजी भारतीय सलामीवीर विरेंद्र सेहवागच्या हाती होती. अर्थातच तो आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये भारताला लाभलेला पहिला कर्णधार होता.

त्याच्यानंतर ६ वेगवेगळ्या खेळाडूंची या पदी वर्णी लागली. यामध्ये माजी कर्णधार एमएस धोनी याच्यासह सुरेश रैना, शिखर धवन, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा समावेश आहे. या ६ शिलेदारांमध्ये धोनीने सर्वाधिक ७२ टी२० सामन्यात संघाचे नेतृत्त्व केले असून संघाला सर्वाधिक ४१ सामनेही जिंकून दिले आहेत. त्याच्यानंतर कोहली ४५ सामन्यांसह (नेतृत्त्व केलेले सामने) या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

या दोघांनंतर मुंबईकर रोहित तिसऱ्या क्रमांकावर आहे. १९ टी२० सामन्यांमध्ये त्याच्या खांद्यावर ही जबाबदारी सोपवली गेली होती. रोहितबरोबरच अजून एक मुंबईकर रहाणे याला २ टी२० सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्त्व करण्याची संधी मिळाली होती. तर धवन आणि रैना यांनी प्रत्येकी ३ टी२० सामने कर्णधाराच्या रुपात खेळले आहेत.

आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये भारताला लाभलेले कर्णधार
एमएस धोनी- ७२ सामने
विराट कोहली- ४५ सामने
रोहित शर्मा- १९ सामने
शिखर धवन- ३ सामने
सुरेश रैना- ३ सामने
अजिंक्य रहाणे- २ सामने
विरेंद्र सेहवाग- १ सामना

महत्त्वाच्या बातम्या-

अररर! ‘मला वाटलेलं कोहली भारतीय संघाऐवजी आरसीबीचे नेतृत्त्वपद सोडेल’, प्रसिद्ध समालोचकाची प्रतिक्रिया

माजी भारतीय कर्णधाराचा नव्या गड्यावर दाव; म्हणाले, रोहित नव्हे ‘त्याला’ भावी लीडरच्या रुपात तयार करा

बुडत्याचा पाय खोलात! टी२०चे नेतृत्त्वपद सोडणाऱ्या विराटला बीसीसीआयकडून मिळणार आणखी एक दणका

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---