---Advertisement---

मार्क बाउचर बनले मुंबई इंडियन्सचे सातवे महागुरू, यापूर्वी ‘या’ 6 दिग्गजांनी दिलेय प्रशिक्षण

On: शुक्रवार, सप्टेंबर 16, 2022 12:36 PM
Rohit-Sharma-Mark-Boucher
---Advertisement---

मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने आयपीएल 2023 साठी मुख्य प्रशिक्षकपदी मार्क बाउचर यांची नियुक्ती केली आहे. मुंबई इंडियन्सने शुक्रवारी (16 सप्टेंबर) याबद्दल सोशल मीडियाद्वारे घोषणा केली आहे. दक्षिण आफ्रिकेचे दिग्गज बाउचर यांना माजी मुख्य प्रशिक्षक माहेला जयवर्धने यांच्याजागी नियुक्त केले गेले आहे. यासह बाउचर हे मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षकपद भूषवणारे सातवे दिग्गज बनले आहेत. मग यापूर्वी मुंबई इंडियन्सला लाभलेले 6 मुख्य प्रशिक्षक कोण होते?

बाउचर (Mark Boucher) यांच्यापूर्वी श्रीलंकेचे महान खेळाडूंपैकी एक माहेला जयवर्धने (Mahela Jayawardene) हे मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी कार्यरत होते. त्यांनी 2017 ते 2022 दरम्यान मुंबई संघाला प्रशिक्षण दिले. त्यांच्या प्रशिक्षणाखाली मुंबईचा संघ 3 वेळा आयपीएल विजेता बनला. 2017, 2019 आणि 2020 अशी 3 वर्षे मुंबईने जयवर्धनेंच्या प्रशिक्षणाखाली चषक जिंकला आहे. जयवर्धनेंपूर्वी रिकी पाँटिंग यांनी मुंबई संघाला प्रशिक्षणाचे धडे दिले होते. ते 2015 आणि 2016 अशी 2 वर्षे संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. यादरम्यान 2015 मध्ये मुंबईचा संघ विजेता बनला होता. 

न्यूझीलंडचे प्रतिभाशाली सलामीवीर आणि दिग्गज क्रिकेटपटू जॉन राईट यांनी 2013 आणि 2014 साली मुंबई संघाच्या प्रशिक्षणाची धुरा सांभाळली होती. त्यांच्याच प्रशिक्षणाखाली मुंबई संघाने पहिल्यांदा 2013 मध्ये आयपीएल चषक उंचावला होता. तसेच रॉबिन सिंग (2010 ते 2012), शॉन पोलॉक (2009) आणि लालचंद राजपूत (2008) हेदेखील मुंबई संघाचे मुख्य प्रशिक्षक राहिले होते.

अशी राहिलीय मार्क बाउचर यांची कामगिरी
दरम्यान दक्षिण आफ्रिकेचे माजी यष्टीरक्षक बाउचर यांच्या नावे कसोटी क्रिकेटमध्ये यष्टीमागे सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम आहे. क्रिकेटमधील निवृत्तीनंतर त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील टायटन्स फ्रँचायझीचे प्रशिक्षकपद भूषवले होते. त्यांनी या फ्रँचायझीला 5 वेळा विजेतेपदही मिळवून दिले होते. 2019 मध्ये क्रिकेट दक्षिण आफ्रिकाने बाउचर यांना मुख्य प्रशिक्षक बनवले होते. त्यांच्या प्रशिक्षणाखाली दक्षिण आफ्रिकेने 11 कसोटी, 12 वनडे आणि 23 टी20 सामने जिंकले आहेत.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! मुंबई इंडियन्सला मिळाले नवे प्रशिक्षक, जयवर्धनेंच्या जागी ‘या’ दिग्गजाची वर्णी
भारताची ऐतिहासिक विजयाची संधी हुकली, इंग्लंडने निर्णायक टी20 जिंकत मालिकाही केली नावावर
तब्बल १२२ वनडे खेळून एकही शतक, एकही सामनावीर पुरस्कार न मिळालेला क्रिकेटर पुढे झाला वकिल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---