---Advertisement---

भारतातील क्रिकेटच्या ‘या’ शिलेदारांना मिळालाय ‘अर्जुन पुरस्कार’; पाहा यादी

---Advertisement---

क्रीडा क्षेत्रात अतुलनिय कामगिरी करणाऱ्या खेळाडांना भारत सरकारकडून अर्जुन पुरस्कार देऊन गौरवले जाते. राष्ट्रीय अर्जुन पुरस्काराची सुरुवात 1961 मध्ये करण्यात आली. राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारानंतरचा भारतातील हा दुसरा सर्वोच्च क्रिडा पुरस्कार आहे.

चार वर्ष सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या क्रीडापटूंना अर्जुन पुरस्कार देण्यात येतो. निवड समितीकडून खेळाडूंना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल नामांकित केले जाते. केंद्रीय युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालयाकडून हा पुरस्कार दिला जातो. पाच लाख रुपये रोख, अर्जुनाचा पुतळा आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

यावर्षी अर्जुन पुरस्कारासाठी भारतीय क्रिकेटपटू इशांत शर्मा, दिप्ती शर्माची निवड झाली आहे. त्यांच्याआधी या पुरस्कारावर आजवर तब्बल 55 क्रिकेटपटूंनी आपले नाव कोरले आहे. 2009 सालापासून दरवर्षी कोणत्या ना कोणत्या क्रिकेटपटूला हा पुरस्कार मिळत आहे.

पाहा भारतातील कोणकोणत्या क्रिकेटपटूला मिळालाय ‘अर्जुन पुरस्कार’

  • (1961-2020)

1- सलीम दुर्रानी (1961)

2- मन्सूर अली खान पतोडी (1964)

3- विजय मांजरेकर (1965)

4- चंदू बोर्डे (1966)

5- अजित वाडेकर (1967)

6- ईरापल्ली प्रसन्ना (1968)

7- बिशन सिंह बेदी (1969)

8- दिलीप सरदेसाई (1970)

9- श्रीनिवासराघवन व्यंकटराघवन (1971)

10- एकनाथ सोलकर (1972)

11- बीएस चंद्रशेखर (1972)

12- अंजन भट्टाचार्जी (1974)

13- सुनील गावस्कर (1975)

14- शांता रंगास्वामी (1976)

15- गुंडप्पा विश्वनाथ (1977-78)

16- कपिल देव (1979-80)

17- चेतन चौहान (1980-81)

18- सैयद किरमानी (1980-81)

19- दिलीप वेंगसरकर (1981)

20- मोहिंदर अमरनाथ (1982)

21- डायना एडुल्जी (1983)

22- रवी शास्त्री (1984)

23- शुभांगी कुलकर्णी (1985)

24- मोहम्मद अजहरुद्दीन (1986)

25- संध्या अग्रवाल (1986)

26- मदन लाल (1987)

27- मनोज प्रभाकर (1993)

28- किरन मोरे (1994)

29- सचिन तेंडुलकर (1995)

30- अनिल कुंबळे (1996)

31- जवागल श्रीनाथ (1997)

32- अजय जडेजा (1997)

33- सौरव गांगुली (1997)

34- राहुल द्रविड (1998)

35- नयन मोंग्या (1998)

36- व्यंकटेश प्रसाद (2000)

37- व्ही. व्ही. एस. लक्ष्मण (2001)

38- विरेंद्र सेहवाग (2002)

39- हरभजन सिंह (2003)

40- मिताली राज (2003)

41- अंजू जैन (2005)

42- अंजुम चोपडा (2006)

43- गौतम गंभीर (2009)

44- झूलन गोस्वामी (2010)

45- झहीर खान (2011)

46- युवराज सिंग (2012)

47- विराट कोहली (2013)

48- रविचंद्रन अश्विन (2014)

49- रोहित शर्मा (2015)

50- अजिंक्य रहाणे (2016)

51- चेतेश्वर पुजारा (2017)

52- हरमनप्रीत कौर (2017)

53- स्मृति मनधाना (2018)

54- पूनम यादव (2018)

55- रविंद्र जडेजा (2019)

56 – इशांत शर्मा (2020)

57 – दिप्ती शर्मा (2020)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---