आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने 2023 मध्ये सर्वोत्तम प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंना पुरस्कार देऊ सन्मानित केले. गुरुवारी घोषित झालेला आयसीसी वनडे क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार विराट कोहली याला मिळाला. 2004 साली हा पुरस्कार द्यायला सुरुवात झाली असून अँड्र्यू फ्लिंटॉफ याने हा मान मिळवला होता. मागच्या वर्षातील प्रदर्शनसाठी विराटला मानाचा वनडे क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार दिला गेला आहे.
विराट कोहली (Virat Kohli) चौथ्यांदा आयसीसी वनडे प्लेअर ऑफ द इयर (ICC ODI Cricketer Of The Year) ठरला आहे. त्याने 2012, 2017, 2018 आणि 2023 सालातील आपल्या प्रदर्शनाच्या जोरावर हे पुरस्कार जिंकले. आयसीसी वनडे क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार आतापर्यंत 11 खेळाडूंनी जिंकला आहे. विराटने त्यात सर्वाधिक चार वेळा हा पुरस्कार जिंकला. विराटव्यतिरिक्त भारताच्या रोहित शर्मा आणि एमएस धोनी यांनी हा पुरस्कार जिंकला आहे.
आयसीसी वनडे क्रिकेटर ऑफ द इयर
2023 – विराट कोहली*
2022 – बाबर आझम
2021 – बाबर आझम
2020 – विराट कोहली (दशकातील सर्वोत्तम)
2019 – रोहित शर्मा
2018 – विराट कोहली
2017 – विराट कोहली
2016 – क्विंटन डी कॉक
2015 – एबी डिविलियर्स
2014 – एबी डिविलियर्स
2013 – कुमार संगकारा
2012 – विराट कोहली
2011 – कुमार संगकारा
2010 – एबी डिविलियर्स
2009 – एमएस धोनी
2008 – एमएस धोनी
2007 – मॅथ्यू हेडन
2006 – मायकल हसी
2005 – केवीन पीटरसन
2004 – अँड्र्यू फ्लिंटॉफ
महत्वाच्या बातम्या –
BREAKING । पुन्हा एकदा विराटच ठरला वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडू, मागच्या वर्षीच्या विक्रमांवर टाका एक नजर
IND vs ENG । हैदराबाद कसोटीचा पहिला दिवस भारताच्या नावावर, अश्विन-जडेजानंतर जयस्वालचा धमाका