शुक्रवारी (२३ ऑक्टोबर) शारजाहच्या मैदानावर आयपीएलचे सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स एकमेकांसमोर आले होते. मात्र दोन्ही संघांमधील या रंगतदार सामन्यात चाहत्यांना रोहित शर्माची कमी भासली. कारण दुखापतीमुळे चेन्नईविरुद्धच्या सामन्यात मुंबईचा नियमित कर्णधार रोहित बाहेर बसला होता. त्यामुळे अष्टपैलू कायरन पोलार्डच्या खांद्यावर संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
मुंबईचे नेतृत्त्वपद सांभाळण्याची ही पोलार्डची पहिलीच वेळ नव्हती. यापुर्वी ४ सामन्यात पोलार्ड मुंबईचा कर्णधार होता. त्याच्याव्यतिरिक्त सचिन तेंडूलकर, हरभजन सिंग, रिकी पाँटिंग, शॉन पोलॉक या क्रिकेटपटूंनी मुंबईचे नेतृत्त्व केले आहे.
२०१३ पासून मुंबईला सर्वाधिक ४ वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकून देणाऱ्या रोहितने सर्वाधिक ११८ सामन्यात मुंबईच्या नेतृत्त्वाची जबाबदारी सांभाळली आहे. तर सचिन ५५ सामन्यात, हरभजन ३० सामन्यात, पाँटिंग ६ सामन्यात आणि पोलॉक ४ सामन्यात मुंबईचे कर्णधार होते.
महत्त्वाच्या बातम्या-
चेन्नई विरुद्ध रोहित संघाबाहेर, ‘हा’ खेळाडू करणार संघाचे नेतृत्त्व
‘जिंकणारा संघ नव्हे हा तर वृद्ध कल्याण केंद्र’, माजी क्रिकेटरची सीएसकेवर बोचरी टीका
आयपीएलदरम्यान क्रिकेटर्स का घालत आहेत एकावर एक टोप्या? हे आहे कारण
ट्रेंडिंग लेख-
‘त्याच’ नाव जरी घेतलं तरी लोकं म्हणायचे, ‘यावर्षी किती कोटी रुपये?’
“कॅप्टन! मी उद्या वर्ल्डकप फायनल खेळणार आहे”, बोट तुटलेले असतानाही ‘तो’ मैदानात उतरला






