भारतीय क्रिकेट परिषद अर्थात बीसीसीआय जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड म्हणून ओळखले जाते. याच बीसीसीआयचा जागतिक क्रिकेटमध्ये एक वेगळाच दरारा आहे. अशा या संघटनेकडून खेळणाऱ्या खेळाडूंना आणि प्रशिक्षकांना बोर्डाकडून चिक्कार मानधन मिळते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील इतर संघांच्या प्रशिक्षकाच्या तुलनेत भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा पगार खूप जास्त आहे. या लेखात आम्ही सर्वाधिक मानधन मिळणाऱ्या टॉप-६ प्रशिक्षकांचा आढावा घेतला आहे.
1) रवी शास्त्री (भारत)
भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री मानधन मिळण्याच्या यादीत अव्वल स्थानावर आहेत. जगातील सर्व क्रिकेट बोर्डांपेक्षा श्रीमंत बोर्ड बीसीसीआय आहे. बीसीसीआय त्यांना जवळपास 9.5 ते 10 कोटी रुपये वर्षाला मानधन देते. ते 2014 ला भारतीय संघाचे निर्देशक म्हणून निवडले गेले होते. त्यानंतर त्यांनी 2017 ला अनिल कुंबळे यांच्याजागी भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची सुत्रे हाती घेतली. तेव्हापासून ते आतापर्यंत ते प्रशिक्षक हे पद सांभाळत आहेत.
रवी शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या प्रशिक्षणाखाली ऑस्ट्रेलियाच्या भूमीतही भारतीय संघाने दोन कसोटी मालिकांमध्ये विजय नोंदविला आहे. याच्याव्यतिरिक्त इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजमध्ये एकदिवसीय सामन्यांची मालिकाही भारतीय संघाने जिंकली आहे.
2) जस्टिन लैंगर (ऑस्ट्रेलिया)
ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टिन लैंगर यांना देखील क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून भरपूर मानधन मिळते. या दिग्गज प्रशिक्षकाला वर्षाला 4.67 कोटी रुपये इतका पगार मिळतो. ते 2018 पासून हे पद सांभाळत आहेत. त्यांच्यापुर्वी प्रशिक्षक राहिलेल्या डेरेन लेहमेन यांना चेंडू छेडछाडीच्या प्रकरणात आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
3) क्रिस सिल्वरवुड (इंग्लंड)
इंग्लंडचे प्रशिक्षक क्रिस सिल्वरवुड या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांना वर्षाला 4.65 कोटी रुपये मानधन मिळते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्लंड संघाने न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या बलाढ्य संघांना पराभूत केले आहेत. याच्या व्यतिरिक्त मागीलवर्षी यजमान दक्षिण आफ्रिकामधील कसोटी मालिका देखील इंग्लंडने जिंकली आहे.
4) मिकी आर्थर (श्रीलंका)
श्रीलंका संघाचे प्रशिक्षक मिकी आर्थर या यादीत चौथ्या क्रमांकावर आहेत. त्यांना दरवर्षी 3.44 कोटी रुपये मानधन मिळते. आर्थर या अगोदर पाकिस्तान क्रिकेट संघाचे प्रशिक्षक होते. श्रीलंका संघाने मागील चार वर्षांमध्ये 9 कर्णधार बदलले आहेत. सध्या करारामुळे बोर्डाचा खेळाडूंशी वाद सुरू आहे. परंतु या सर्वांमध्ये आर्थर यांचा करार सुरक्षित आहे.
5) मिसबाह उल हक (पाकिस्तान)
पाकिस्तानचे प्रशिक्षक मिसबाह उल हक यांचा देखील यादीत समावेश आहे. त्यांनी मिकी आर्थरच्या नंतर मागीलवर्षी ही जबाबदारी स्विकारली आहे. 46 वर्षीय मिस्बाह यांना पाकिस्तान क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठी पीसीबी कडून एकूण 1.79 कोटी रुपये वर्षाला मिळतात.
6) गैरी स्टीड (न्यूझीलंड)
न्यूझीलंडचे प्रशिक्षक गैरी स्टीड यांना देखील वर्षाला 1.72 करोड रुपये मानधन मिळते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली न्यूझीलंड संघ 2019 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पोहोचला. आता त्यांना भारताविरुद्ध विश्व कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यात खेळायचे आहे. गैरी स्टीड यासाठी खेळाडूंना तयार करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
त्रासदायक ठरत असलेल्या आफ्रिदीला अझरूद्दीनने दिला होता ‘हा’ सल्ला, पाहा व्हिडिओ
“तेव्हा एक तासाचा प्रवास करून रिषभ माझ्याकडे रात्री साडेतीन वाजता माफी मागायला आला”
तो मुलगा नक्की कोण? धोनीच्या व्हायरल झालेल्या जून्या फोटोवर चाहत्यांना पडला प्रश्न