एकदिवसीय क्रिकेट प्रकारात म्हणजेच मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये फलंदाजांची कामगिरी अधिक महत्वाची असते. त्यात प्रत्येक संघाच्या वरच्या फळीतील फलंदाजांवर संघाची अधिक भिस्त असते. कोणत्याही संघाची सलामीची जोडी, ही जितकावेळ खेळपट्टीवर तग धरेल तितका तो संघ विजयाची अपेक्षा अधिक बाळगून असतो. याचे कारण मोठी धावसंख्या उभारण्यासाठी सलामीच्या फलंदाजांनी अधिक वेळ खेळणे आणि धावा करणे आवश्यक असते.
“सलामीला फलंदाजी करणे हे जितके जोखमीचे तितकेच कौशल्याचे काम असते. कारण, खेळपट्टीवर सलामीला उतरल्यावर नव्या चेंडूचा सामना करताना खेळाडूचा खरा कस लागतो. मात्र, एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात असे काही सामने आहेत, ज्यात सलामीच्या फलंदाज जोडीने पहिल्या विकेटसाठी अक्षरशः धावांचा डोंगर उभा केला.”
या लेखात आपण अशा ऐतिहासिक भागीदारी पाहणार आहोत, ज्यात सलामीच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी सर्वोत्तम धावसंख्या उभारली आहे.
एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्या विकेटसाठी सर्वात मोठी धावसंख्या आणि भागीदारी करण्याचा विक्रम वेस्ट इंडीज संघाच्या जॉन कॅम्पबेल आणि शाई होप यांनी केला आहे. या कॅरेबियन खेळाडूंनी 2019 साली आयर्लंड संघाविरुद्ध एकदिवसीय सामना खेळताना सर्वोत्तम 365 धावा केल्या होत्या. या धावसंख्येसह या जोडीने पहिल्या विकेटसाठी सर्वोत्तम धावसंख्या उभारण्याचा विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे.
“वेस्ट इंडीजच्या या खेळाडूंनी 2019 साली हा विक्रम करताना पाकिस्तानच्या फखर जमान आणि इमाम उल हक यांचा सर्वोत्तम भागीदारीचा विक्रम देखील मोडला होता”
पाकिस्तान संघातील फखर जमान आणि इमाम उल हक या सलामीच्या जोडीने 2018 साली झिम्बाम्ब्वे संघाविरुद्ध वनडे खेळताना, पहिल्या विकेटसाठी 304 धावांची भागीदारी केली होती. तसेच एकदिवसीय क्रिकेट इतिहासातील ही पहिलीच वेळ होती जेव्हा सलामीच्या जोडीने ३०० पार धावसंख्या उभारली होती.
एकदिवसीय सामन्यांमध्ये आतापर्यंत सलामीच्या फलंदाजांनी 200 पेक्षा अधिक धावसंख्या करण्याची अनेक उदाहरणे आहेत. यात जगातील अनेक दिग्गज फलंदाजांची नावे समाविष्ट आहेत. भारताकडून पहिल्या विकेटसाठी सर्वोत्तम धावसंख्या उभारणारे दोन दिग्गज फलंदाज या यादीत आहेत.
एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये पहिल्या विकेटसाठी सर्वोत्तम भागीदारी करणाऱ्या सलामी फलंदाजांच्या दहा जोड्या ;
क्रमांक – 1
फलंदाज – जॉन कॅम्पबेल आणि शाई होप (वेस्ट इंडीज)
पहिल्या विकेटसाठी भागीदारी – 365 धावा
विरुद्ध आयर्लंड (डब्लिन, 5 मे 2019)
क्रमांक – 2
फलंदाज – इमाम उल हक आणि फखर जमान (पाकिस्तान)
पहिल्या विकेटसाठी भागीदारी – 304 धावा
विरुद्ध झिम्बाम्ब्वे (बुलावायो, 20 जुलै 2018)
क्रमांक – 3
फलंदाज – तमीम इकबाल आणि लीटन दास (बांगलादेश)
पहिल्या विकेटसाठी भागीदारी – 292 धावा
विरुद्ध झिम्बाम्ब्वे (सिलहट, 6 मार्च 2020)
क्रमांक – 4
फलंदाज – उपुल थरंगा आणि सनथ जयसुर्या (श्रीलंका)
पहिल्या विकेटसाठी भागीदारी – 286 धावा
विरुद्ध इंग्लंड (लीड्स, 1 जुलै 2006)
क्रमांक – 5
फलंदाज – डेव्हीड वॉर्नर आणि ट्रेविस हेड (ऑस्ट्रेलिया)
पहिल्या विकेटसाठी भागीदारी – 284 धावा
विरुद्ध पाकिस्तान (एडिलेट, 26 जानेवारी 2017)
क्रमांक – 6
फलंदाज – क्विंटन डी कॉक आणि हाशिम आमला (दक्षिण आफ्रिका)
पहिल्या विकेटसाठी भागीदारी – 282 धावा (नाबाद)
विरुद्ध बांगलादेश (किमबर्गे, 15 ऑक्टोबर 2017)
क्रमांक – 7
फलंदाज – उपुल थरंगा आणि तिलकरत्ने दिलशान (श्रीलंका)
पहिल्या विकेटसाठी भागीदारी – 282 धावा
विरुद्ध झिम्बाम्ब्वे (पल्लेकेले, 10 मार्च 2011)
क्रमांक – 8
फलंदाज – जेम्स मार्शल आणि बैंडम मॅक्युलम (न्युझीलंड)
पहिल्या विकेटसाठी भागीदारी – 284 धावा
विरुद्ध आयर्लंड (एबर्डीन, 1 जुलै 2008)
क्रमांक – 9
फलंदाज – आरोन फिंच आणि डेव्हीड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया)
पहिल्या विकेटसाठी भागीदारी – 258 धावा (नाबाद)
विरुद्ध भारत (मुंबई, 14 जानेवारी 2020)
क्रमांक – 10
फलंदाज – सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली (भारत)
पहिल्या विकेटसाठी भागीदारी – 258 धावा
विरुद्ध केनिया (पर्ल, 24 ऑक्टोबर 2001)