रावळपिंडी येथे पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात एका क्षणी पाकिस्ताननं आपली पकड चांगलीच मजबूत केली होती. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी अवघ्या 26 धावांत बांगलादेशच्या 6 खेळाडूंना बाद केलं होतं. एकेकाळी बांगलादेशचा संघ 50 धावाही करू शकणार नाही, असं वाटत होतं. मात्र, खालच्या फळीत लिटन दासनं असं होऊ दिलं नाही. त्यानं शानदार शतक झळकावून पाकिस्तानला मोठी आघाडी घेण्यापासून रोखलं.
सामन्यात पाकिस्तानचा संघ प्रथम फलंदाजी करताना केवळ 274 धावाच करू शकला. प्रत्युत्तरात, बांगलादेशचा संघ सहज आघाडी घेईल असं वाटत होतं, पण तसं झालं नाही. दुसऱ्या डावात फलंदाजीला आलेल्या बांगलादेशची आघाडीची फळी पूर्णपणे फ्लॉप ठरली. संघाच्या 26 धावांत केवळ 6 विकेट पडल्या. गेल्या सामन्यात जबरदस्त शतक झळकावणाऱ्या मुशफिकुर रहीमला या सामन्यात केवळ 3 धावा करता आल्या. मात्र, खालच्या फळीत लिटन दास आणि मेहदी हसन मिराज यांनी डावाची धुरा सांभाळली. या दोन फलंदाजांनी सातव्या विकेटसाठी 165 धावांची भागीदारी केली.
मेहदी हसन मिराजनं 124 चेंडूत 12 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीनं 78 धावा केल्या. तर लिटन दासनं शानदार शतक झळकावलं. त्यानं दोन वर्षांनंतर कसोटीमध्ये शतक झळकावत बांगलादेशला सामन्यात परत आणलं. त्याच्या शतकामुळेच बांगलादेशच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पाकिस्तान संघ मोठी आघाडी घेण्याचा प्रयत्न करत होता, परंतु लिटन दासनं तसं होऊ दिलं नाही.
लिटन दासच्या शतकानंतर चाहत्यांनी पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझमला ट्रोल करण्यास सुरुवात केली. काही युजर्सनं बाबरला लिटनकडून शिकण्याचा सल्ला दिला. बाबर या मालिकेत पूर्णपणे फ्लॉप झाला आहे. ज्यामुळे तो खूप ट्रोल होतोय.
हेही वाचा –
‘हिटमॅन’च्या निशाण्यावर वीरेंद्र सेहवागचा जबरदस्त रेकॉर्ड… बांगलादेश मालिकेत रचणार इतिहास!
‘बेझबॉल’ फक्त नावालाच! टीम इंडियाच्या ‘सिक्स हिटिंग’समोर इतर सर्व संघ फेल
जागतिक क्रिकेटचा नवा ‘सिक्सर किंग’! ख्रिस गेलचा 9 वर्ष जुना विक्रम उध्वस्त