बांगलादेशचा यष्टीरक्षक फलंदाज लिटन दास आशिया चषक संघाचा भाग नव्हता. दुखापतीच्या कारणास्तव त्याला या संघात घेतले गेले नव्हते. मात्र, सुपर फोरच्या सामन्यांमध्ये लिटन दार बांगलादेशसाठी खेळताना दिसणार आहे. सुपर फोर सामन्यांसाठी लिटन लाहोरमध्ये दाखल झाला आहे. मंगळवारी (5 सप्टेंबर) त्याला बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडून खेळण्याची परवानगी मिळाली.
बांगलादेश क्रिकेट संघाचे मुख्य निवडकर्ते मिन्हाजूल अबेदीन यांनी लिटन दासच्या फिटनेसबाबत ही चांगली माहिती चाहत्यांना दिली. निवडकर्ते म्हणाले की, “संघातील अनेकजण दुखापतीचा सामना करत आहेत. त्यामुळे लिटन दास याला संघात घेतले गेले आहे.” दरम्यान, अफगाणिस्तानविरुद्ध शतक करणारा नजमूल हुसेन शांता याला लाईव्ह सामन्यात काही वेळा हँमस्ट्रिंगचा त्रास झाला. तसेच या सामन्यातील दुसरा शतकवीर मेहदी हसन मिराज यालाही कोटांच्या दुखापतीमुळे त्रास होत होता. मेहदी हसन याच कारणास्तव शतक केल्यानंतर रिटायर्ट हर्ट झाला होता. त्याचसोबत श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमान यालाही हलकी दुखापत झाली होती, ज्यामुळे तो अफगाणिस्तानविरुद्ध खेळू शकला नव्हता.
“आशिया चषकात संघातील काही खेळाडू दुखापतग्रस्त आहेत आणि यामुळेच आम्ही चिंतेत आहोत. संघ व्यवस्थापनाला सुपर फोरमध्ये एका अतिरिक्त खेळाडूची गरज होती. आम्ही लिटन दासच्या फिटनेसबाबत बीसीबीच्या मेडिकल टीमकडून परवानगी घेतली आहे. त्याला पाकिस्तानमध्ये पाठवले जाणार आहे,” अशी माहिती मिन्हाजूल यांच्याकडून मिळाली होती.
दरम्यान, बांगलादेशचे आशिया चषक 2023 मधील प्रदर्शन पाहिले, तर शाकिब अस हसन कर्णधार असलेल्या संघाला पहिल्या सामन्यात श्रीलंकेकडून पराभव स्वीकारावा लागला होता. पण दुसऱ्या सामन्यात बांगलादेशने शानदार पुनरागमन केले आणि अफगाणिस्तानवर विजय मिळवला. अफगाणिस्तानविरुद्ध प्रथम फलंदाजी करणाता बांगलादेशने 334 धावा केल्या. यात शांतो आणि मेहदी हसन यांच्या शतकांचे समावेश होता. प्रत्येत्तरा अफगाणिस्तान संघ 245 धावांवर गुंडाळला गेला. (Liton Das returns to Bangladesh squad for Asia Cup Super Four round)
महत्वाच्या बातम्या –
भारत-पाक सामना पाहण्यासाठी खर्च करावी लागणार आयुष्यभराची कमाई, तिकिटांची किंमत भिडली गगनाला
Virat Kohli Dance । नेपाळच्या पॉप्यूलर गाण्यावर विराटने लाईव्ह सामन्यात लावला ठुमका, व्हिडिओ व्हायरल