क्रिकेट हा खेळ भारतात एखद्या धर्माप्रमाणे असून क्रिकेटपटू हे देव आहेत. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षांत महिला क्रिकेटची लोकप्रियता देखील झपाट्याने वाढली आहे. याचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की, आता अनेक लहान मुली देखील क्रिकेट मध्ये करियर करण्याच्या तयारीत आहेत. अलीकडेच इन्स्टाग्रामवर असाच एक व्हिडिओ वायरल होत असून, त्यातून हे सिद्ध झाले आहे की भारतातील महिला क्रिकेटचे भविष्य उज्वल आहे.
सोशल मीडियावर वायरल होणारा हा व्हिडिओ केरळच्या मेहक नावाच्या मुलीचा आहे. व्हिडिओमध्ये मेहक स्ट्रेट ड्राईव्ह, पुल आणि फ्लिक शॉट्स खेळताना दिसून येत आहे. मेहकची फलंदाजी पाहून सर्वांनाच आश्चर्य होत आहे. कारण इतक्या कमी वयात ती स्ट्रेट ड्राईव्ह, पुल शॉट्स खेळत आहे. हे शॉट्स बघायला सोपे वाटतात,पण त्यांना खेळणे फार अवघड असते.
मेहकचा हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तिचे मोठ्या प्रमाणात कौतुक केले आहे. अनेकांनी तिची तुलना भारतीय महिला क्रिकेट मधील स्टार जेमिमा रॉड्रिग्ज आणि स्मृति मंधाना यांच्याशी केली आहे. विशेष म्हणजे जेमिमाने देखील मेहकचे कौतुक केले आहे.
https://www.instagram.com/p/CPSKeGMFqr6/?utm_source=ig_web_copy_link
मागील काळात देखील असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे तो व्हिडिओ देखील केरळचाच होता. या व्हिडिओमध्ये विघ्नज प्रेजीत हा 9 वर्षाचा मुलगा स्टंप घेऊन फलंदाजी करताना दिसत होता. यावेळी त्याने एबी डिव्हिलियर्स सारखा स्कूप शॉटसुद्धा खेळला होता. हा व्हिडिओ ट्वीटरवर वायरल झाल्यानंतर अनेकांनी त्या लहान मुलाचे कौतुक केले होते. रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने या मुलाचा वायरल व्हिडिओ राजस्थान रॉयल्स पाठवला होता. व यानंतर राजस्थान रॉयल्स संघाने या मुलाला स्पॉन्सर करण्याचा निर्णय घेतला होता, व त्याला क्रिकेटसाठीचे आवश्यक साहित्य दिले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
त्या ट्विटमुळे झिम्बाब्वेच्या क्रिकेटपटूची कारकीर्द धोक्यात? बोर्ड कारवाई करण्याची शक्यता
जेव्हा विराटला पत्नी अनुष्का म्हणाली होती, ए कोहली चौका मार ना.., व्हिडिओ होतोय व्हायरल
वाढदिवस विशेष: कारकिर्दीत अनेक वादळे येऊनही नरीन आपली मिस्ट्री टिकवून आहे