सुनील गावसकर हे नाव ऐकताच विजयाचा जयघोष कानांवरती पडतो. गावसकर ही क्रिकेटविश्वातील मोठी आसामी. सोमवारी (दि. 10 जुलै) गावसकर 74वा वाढदिवस साजरा करत आहेत. चला तर, आज आम्ही तुम्हाला या दिग्गज खेळाडूची अनोखी कहाणी सांगणार आहोत, जी क्वचितच लोकांना माहिती असेल.
सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांचा एक मित्र कॅरेबियनचा होता. आता तुम्हाला प्रश्न पडेल यामध्ये नवल काय, तर नवल असे की, आयपीएल खेळासाठी वानखेडे स्टेडियमवर त्रिनदादमधील इस्पहानी अली (Ispahani Ali) म्हणजेच ‘इसपी’ कॉमेंट्री करत होते. यावेळी कॉमेंट्रीदरम्यान, गावसकरांचा किस्सा समोर आला, आणि ती आठवण होती 70 ते 80च्या दशकातील. जेव्हा गावसकर ‘सनी’ बनले होते आणि तेव्हापासून जागतिक क्रिकेटचे खरे मास्टर म्हणून ओळखले जाऊ लागले.
यावेळी इसपी म्हणाले की, आजही कोणी सुनील गावसकर यांच्या उत्कृष्टतेच्या जवळ येत नाही. आत्ताची नवी पिढी इंडियन प्रीमियर लीगकडे (आयपीएल) झुकली आहे, पण त्यांच्यासाठी आजही सनी सर्वात महान आहे. पुढे ते म्हणतात की, आजच्या सेल्फी पिढीला हे समजणार नाही की, त्रिनिदादमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी गावसकर काय आहेत. कारण त्यावेळी वेस्ट इंडिजसोबत खेळत असताना गावसकर हेल्मेटशिवाय खेळत होते.
“आपण जे आता पाहतो ते काहीही नाही, त्यावेळी संध्याकाळी हॉटेलची लॉबी माणसांनी खचाखच भरून जायची, फक्त आणि फक्त सनीला पाहण्यासाठी. हजारो लोक ऑटोग्राफ आणि हॅलो म्हणण्यासाठी वाट पाहत होते,” आठवणींना उजाळा देत इसपी यावेळी म्हणाले.
सन 1971च्या दौऱ्यात आलेल्या नवीन मुलाला म्हणजेच गावसकर यांना वेस्ट इंडिजने आऊट करण्याची योजना आखली होती. त्यावेळी गावसकर सर्वांच्या पाठीशी उभे राहिले. वेस्ट इंडिजमध्ये अजूनही त्यांचा मोठा चाहतावर्ग आपल्याला दिसून येतो. इसपी म्हणाले की, “वेस्ट इंडिजचे गोलंदाज खूप वेगवान आहेत, जर त्यांना तुम्ही आवडत नसाल, तर ते तुम्हाला टार्गेटदेखील करू शकतात. सुनील गावसकर यांना खेळादरम्यान फटकारण्यासाठी वेस्ट इंडिजची बैठक बसली होती. त्याने कधीही सामन्यादरम्यान हेल्मेट घातले नाही, मी त्याला विचारले की, तू हेल्मेट का घालत नाही? तर त्यावर तो म्हणाला की, तो कधीही घाबरत नाही.”
दरम्यान, इसपीचे वडील रिअल इस्टेट व्यवसायामध्ये होते, तर 1971 मध्ये ते त्याच हॉटेलमध्ये होते, जिथे भारतीय संघ थांबला होता. त्या दिवसात बाहेरचे जेवण मिळणे फारच कठीण होते, आणि त्यामुळे त्याच्या वडिलांनी संपूर्ण भारतीय संघासाठी जेवणाची व्यवस्था करून दिली होती. दरम्यान, गावसकर यांचा हा पहिलाच कॅरेबियन दौरा होता आणि तेव्हापासून ते दोघे घट्ट मित्र झाले.
त्यावेळी जसजसा सनी प्रसिद्ध होत गेला तसतसा इसपी वेस्ट इंडिजमध्ये संपर्क साधणारा माणूस बनला. त्यावेळी खेळाडूंसोबत प्रवास करणारे एजंट नव्हते आणि त्यामुळे जेव्हा चाहत्यांनी गावसकर यांना चहाच्या ब्रेकमध्ये त्यांच्याशी बोलताना पाहिलं, तेव्हा त्यांना भेटण्यासाठी अनेक विनंत्या करण्यात आल्या. “सर्वजण एकत्र आले आणि सर्वांनी एकच विनंती केली, अरे, आपण यांना भेटूयात का?”
त्यावेळी त्रिनिदादमधील कुटुंबांनी त्यांच्या मुलाचे नाव सुनील ठेवण्याचा निर्णय घेतला अशी क्रेझ सुरू झाली होती. पुढे त्यांनी सांगितले की, “सुनीलने क्रिकेट दरम्यान, धावा करायला सुरुवात केल्यानंतर आणि लोकप्रिय झाल्यानंतर, बहुतेक कुटुंबांनी त्यांच्या नवजात मुलाचे नाव त्याच्या नावावर ठेवले आणि त्रिनिदादमध्ये जेव्हाही तुम्ही जाल तेव्हा तुम्हाला सुनील नावाची अनेक मुले सापडतील, विशेषत: ज्यांचा जन्म 70-80च्या दशकात झालेला आहे. माझे चार मित्र आहेत त्यांची नावे सुनील आहेत, जे आता अमेरिकेमध्ये आहेत.”
एकदा गावसकर रोहन कन्हाईच्या मुलाच्या वाढदिवसाला गेले होते, तेव्हा गावसकर ऑटोग्राफ देण्यासाठी खूप थकले होते. कारण त्यांच्याकडे भरपूर लोक येऊन गेले होते, त्यामुळे त्यांनी इसपीला त्यांच्या वतीने सही करण्याची विनंती केली आणि मी त्यावेळी असे लिहिले की, “मी फक्त सुनीलला मदत करतोय, तो थकला आहे.”
गावसकर नेहमीच विनोद करत असत. क्रिकेटबद्दल कमी बोलतात आणि नातवंडांबद्दल जास्त बोलतात. इतक्या वर्षांनंतरही त्याची लोकप्रियता अद्याप कमी झालेली नाही, असे पुढे इस्पी म्हणतात.
“तीन दशकांहून अधिक काळ गावसकरांनी खेळणं सोडून दिलं, पण आजही तो त्रिनिदादला गेला तरी लोकांचा जमाव होतो. पोर्ट ऑफ स्पेनमधील एक चायनीज रेस्टॉरंट ‘हाऊस ऑफ चॅन’, जेव्हा तो रेस्टॉरंटमध्ये फिरतो, तेव्हा अजूनही ते प्रसिद्ध कॅलिप्सो गाणे वाजवले जाते.”
गावसकरांची कारकीर्द
गावसकरांच्या कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर त्यांनी 125 सामन्यातील 214 डावात 51.12च्या सरासरीने 10122 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्यांनी 34 शतके आणि 45 अर्धशतकेही झळकावली आहेत. यादरम्यान त्यांची नाबाद 236 ही सर्वोत्तम धावसंख्या आहे. याव्यतिरिक्त त्यांनी 108 सामने खेळताना 35.13च्या सरासरीने 3092 धावा केल्या आहेत. यामध्ये त्यांच्या नावावर फक्त 1 शतक आहे. (Little Master’s popularity in West Indies gavaskars friend Ispahani Ali narrates tales of the sunny)
महत्वाच्या बातम्या-
नातेवाईकांच्या समजदारीमुळे वाचले सुनील गावसकर, नाहीतर बनले असते थेट मच्छिमार
घातक वेगवान गोलंदाजांविरुद्ध हेल्मेटशिवाय का खेळायचे गावसकर? ‘हे’ होतं कारण